Redmi ची बहुप्रतीक्षित Redmi Note 13 5G सीरीज भारतात अखेर लाँच झाली आहे. या सिरीजमध्ये कंपनीन Redmi Note 13 Pro 5G आणि Redmi Note 13 Pro+ 5G असे दोन स्मार्टफोन्स देखील सादर केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. प्रो प्लस फोनमध्ये 200MP कॅमेरा आणि 120W हायपरचार्ज सपोर्ट मिळेल. तर, Redmi Note 13 मध्ये 108MP मेन कॅमेरा सारखे फीचर्स दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
हे सुद्धा वाचा: प्रतीक्षा संपली! 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X100 Series भारतात अखेर लाँच, जाणून घ्या किंमत। Tech News
Redmi Note 13 स्मार्टफोनचा 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंट 16,999 रुपयांना, 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 18,999 रुपयांना आणि 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 20,999 रुपयांना आणला गेला आहे. Redmi Note 13 फोनची विक्री Amazon आणि Mi.com वर सुरू होईल. या फोनची विक्री 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्ड्सवर 1000 रुपयांची सूट आणि 1000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल.
त्याबरोबरच, Redmi Note 13 Pro चा 8GB + 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 23,999 रुपयांना लाँच झाला आहे. तर, 8GB RAM + 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 25,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तसेच, 12GB रॅम + 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 27,999 रुपयांना सादर करण्यात आला आहे. हा फोन कोरल पर्पल, आर्क्टिक व्हाईट आणि मिडनाईट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये मिळेल.
या फोनवरील ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यावर 2000 रुपयांची ऑफर आणि 2000 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल.
Redmi Note 13 Pro+ स्मार्टफोनच्या 8GB + 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. 12GB + 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 31,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तसेच, 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये आहे.
ICICI बँकेच्या कार्डांवर 2000 रुपयांची सूट आणि 2000 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. त्याची विक्री फ्लिपकार्टवर 10 जानेवारीपासून सुरू होईल. हा फोन फ्यूजन पर्पल, फ्यूजन ब्लॅक आणि फ्यूजन व्हाईट या तीन कलर ऑप्शन्ससह येतो.
Redmi Note 13 मध्ये AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी तुम्हाला गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 108MP मेन कॅमेरा देण्यात आला आहे. तर, मल्टी-टास्किंगसाठी फोनमध्ये MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये 33W टर्बो चार्जिंग सपोर्टसह बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP54 रेटिंग देखील मिळाली आहे.
Redmi Note 13 Pro मध्ये फोनमध्ये 1.5K AMOLED डिस्प्ले देखील आहे. त्याची कमाल ब्राइटनेस 1800 निट्स आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी यात 200MP मुख्य कॅमेरा मिळेल. सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे.
Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये 3D कर्व 1.5K 6.6 इंच लांबीचा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याबरोबरच, डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला व्हिक्टस संरक्षणासह देखील येईल. हा स्मार्टफोन MediaTek 7200 Ultra 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 200MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन NFC फीचरसह आणण्यात आला आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये 120W हायपरचार्ज सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी आहे. यासह स्मार्टफोन अवघ्या 19 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो.