digit zero1 awards

Redmi Note 13 सीरीजच्या भारतीय लाँच डेटची घोषणा, 200MP कॅमेरासह ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल। Tech News 

Redmi Note 13 सीरीजच्या भारतीय लाँच डेटची घोषणा, 200MP कॅमेरासह ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल। Tech News 
HIGHLIGHTS

Redmi Note 13 Series च्या भारतीय लाँच डेट जाहीर

Redmi Note 13 5G सीरीज भारतात 4 जानेवारी 2024 रोजी लाँच होणार

कंपनी या फोन्सना 'SuperNote' म्हणून संबोधत आहे.

Xiaomi ने Redmi Note 13 Series च्या भारतीय लाँचची घोषणा केल्यापासून आगामी स्मार्टफोन चर्चेत आहे. तेव्हापासून भारतीय मोबाईल वापरकर्ते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यानंतर, आज कंपनीने आपल्या आगामी Redmi Note 13 5G सीरीजच्या इंडिया लाँच डेट घोषणा केली आहे. हा फोन फोटोग्राफीसाठी उत्तम असणार आहे कारण यामध्ये 200MP कॅमेरा मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात आगामी Redmi Note 13 सिरीजचे लाँच डिटेल्स.

Redmi Note 13 Series लाँच डिटेल्स

Redmi Note 13 5G सीरीज भारतात 4 जानेवारी 2024 रोजी लाँच होईल. या सिरीजअंतर्गत Redmi Note 13 5G, Redmi Note 13 Pro 5G आणि Redmi Note 13 Pro+ 5G भारतात लाँच होतील, अशी अपेक्षा आहे. कंपनी या फोन्सना ‘SuperNote’ म्हणून संबोधत आहे.

Redmi Note 13 5G चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 13 5G फोन 6.67 इंच लांबीच्या फुल HD + डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही स्क्रीन एका AMOLED पॅनेलवर बनवली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. यात MediaTek Dimensity 6080 octa-core प्रोसेसर देण्यात येईल, जो 2.4 GHz क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन Mali-G57 GPU ला सपोर्ट करतो. फोनमध्ये तुम्हाला रॅम एक्सपान्शन टेक्नॉलॉजी देखील मिळू शकतो. हा फोन Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर लॉन्च करण्यात आला आहे जो MIUI 14 सोबत काम करेल, अशी अपेक्षा आहे.

Redmi Note 13 Pro Plus launch timeline

कॅमेरा विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Redmi Note 13 5G च्या मागील पॅनलवर F/1.7 अपर्चरसह 100MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. त्याबरोबरच, 2MP डेप्थ सेन्सर देखील मिळेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी Redmi Note 13 5G फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.

मात्र, Redmi Note 13 5G सिरीजचे सर्व तपशील आणि कन्फर्म माहिती ही स्मार्टफोन सिरीज लाँच झाल्यानंतरच पुढे येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo