आगामी Redmi Note 13 Pro+ 5G चे इंडिया लाँच कन्फर्म, 200MP कॅमेरासह भारतात होणार दाखल। Tech News 

आगामी Redmi Note 13 Pro+ 5G चे इंडिया लाँच कन्फर्म, 200MP कॅमेरासह भारतात होणार दाखल। Tech News 
HIGHLIGHTS

पॉवरफुल स्मार्टफोन Redmi Note 13 Pro+ 5G च्या भारतीय लाँचची घोषणा

Redmi Note 13 Pro+ 5G भारतात जानेवारी 2024 मध्ये लाँच केला जाईल.

स्मार्टफोनमध्ये OIS सह 200MP Samsung ISOCELL HP3 प्रायमरी सेन्सर मिळेल.

Redmi ने बुधवारी आपला बजेट स्मार्टफोन Redmi 13C लाँच केला. त्याबरोबरच, कंपनीने आपला पॉवरफुल स्मार्टफोन Redmi Note 13 Pro+ 5G भारतात लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा मोबाईल फोन भारतात पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये लाँच केला जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात या फोनची लाँच डेट आणि संपूर्ण तपशील-

Redmi Note 13 Pro+ 5G

Redmi Note 13 Pro+ 5G इंडिया लाँच

वर सांगितल्याप्रमाणे, Redmi Note 13 Pro+ 5G भारतात जानेवारी 2024 मध्ये लाँच केला जाईल. यासह कंपनीने या फोनचे इंडिया लाँच कन्फर्म केले आहे. जरी ब्रँडने अद्याप अचूक लाँच तारीख उघड केली नाही. तरी, ब्रँडने Note 13 Pro+ 5G पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत दाखल होईल, याची पुष्टी केली आहे.

Redmi Note 13 Pro+ 5G चे अपेक्षित तपशील

हा स्मार्टफोन Android 13 सह चीनच्या बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्यानुसार, Redmi Note 13 Pro+ मध्ये 6.67-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह असेल. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी यात व्हिक्टस कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी Redmi Note 13 Pro+ 5G मध्ये Qualcomm Snapdragon 7S Gen 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये 16 GB RAM मेमरी आणि 512 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजला सपोर्ट करतो.

Redmi Note 13 Pro+ launch timeline

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये OIS सह 200MP Samsung ISOCELL HP3 प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000 mAh बॅटरी आहे, जी 120W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या सपोर्टसह येते.

फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 3.5 mm हेडफोन जॅक, IR ब्लास्टर, ड्युअल सिम 5G, WiFi 6, ब्लूटूथ 5.3, NFC ने सुसज्ज आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी यात IP68 रेटिंग देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo