Xiaomi ने भारतात Redmi Note 13 सिरीजमधील दोन मॉडेल्ससाठी नवीन आणि अनोखे कलर सादर केले आहेत. फोनमध्ये Redmi Note 13 Pro 5G स्कारलेट रेड आणि Redmi Note 13 5G क्रोमॅटिक पर्पल कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा डिवाइस जानेवारी 2024 मध्ये सादर केला गेला होता. जो आता नव्या रुपात बाजारात विक्रीसाठी सज्ज आहे.
Also Read: Price Cut! प्रीमियम फोन Samsung Galaxy S23 झाला तब्बल 18000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत
Redmi Note 13 Pro फोनच्या Scarlet Red Edition च्या 8GB RAM + 128GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. तर, फोनच्या 8GB RAM + 256GB मॉडेलची किंमत 26,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंग व्यवहारांवर 3,000 रुपयांची झटपट सूट मिळेल.
Redmi Note 13 5G फोन क्रोमॅटिक पर्पल कलरमध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेजसह 16,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Redmi Note 13 5G च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आणि 12GB + 256GB ची किंमत 20,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक, SBI, Axis Bank आणि Kotak Bank कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास 1,500 ची झटपट सूट देखील दिली जात आहे.
Redmi Note 13 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देखील आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी, स्मार्टफोनमध्ये Samsung ISOCELL HP3 सेन्सर, 8MP अल्ट्रावाइड आणि 2MP मॅक्रो लेन्ससह 200MP प्रायमरी कॅमेरा आहे. तसेच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 16MP फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 5100mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 67W टर्बोचार्ज फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येईल.