200MP कॅमेरासह येणाऱ्या नव्या Redmi फोनची Sale सुरु, पहिल्या सेलमध्ये मिळवा 2000 रुपयांची सूट। Tech News

Updated on 10-Jan-2024
HIGHLIGHTS

Redmi Note 13 5G सीरीजची सेल आजपासून भारतात सुरु

सिरीजअंतर्गत Redmi Note 13 5G, Note 13 Pro 5G आणि Note 13 Pro+ 5G हे तीन हँडसेट येतात.

लॉन्च ऑफर अंतर्गत कंपनी HDFC बँक क्रेडिट कार्ड मोठी सवलत मिळवा.

Xiaomi ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात Redmi Note 13 5G सीरीज लाँच केली. या लाइनअपमध्ये Note 13 5G, Note 13 Pro 5G आणि Note 13 Pro+ 5G असे तीन हँडसेट समाविष्ट आहेत. आज हे स्मार्टफोन्स भारतात पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. चला तर मग त्यांची भारतीय किंमत, लॉन्च ऑफर, स्पेसिफिकेशन्स इ. सर्व माहिती जाणून घेऊयात.

Redmi Note 13 5G सिरीजची किंमत

Redmi Note 13 5G सिरीजची किंमत भारतात 17,999 रुपयांपासून सुरू होऊन 35,999 रुपयांपर्यंत आहे. वर सांगितल्याप्रमाणे, Redmi Note 13 5G आज दुपारी 12 वाजल्यापासून Amazon, Mi Sore आणि इतर रिटेल चॅनेलवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. तर, Pro आणि Pro+ मॉडेल्सची सेल Flipkart, Mi Store आणि इतर रिटेल आउटलेट्सवर केली जाईल.

Redmi Note 13 5G

फोनमध्ये उपलब्ध इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, लॉन्च ऑफर अंतर्गत कंपनी HDFC बँक क्रेडिट कार्ड, ICICI बँक क्रेडिट कार्ड (EMI आणि नॉन-EMI) आणि ICICI बँक डेबिट कार्ड EMI व्यवहारांद्वारे या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

Redmi Note 13 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 13 मध्ये AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी तुम्हाला गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. तर, स्पीड आणि मल्टी-टास्किंगसाठी फोनमध्ये MediaTek Dimensity 6080 प्रोसेसर उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 108MP मेन कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 33W टर्बो चार्जिंग सपोर्टसह बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP54 रेटिंग देखील मिळाली आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :