Redmi आज स्मार्टफोनच्या विश्वात मोठा धमाका करणार आहे. कंपनी आज आपली Redmi Note 12 सीरीज लाँच करणार आहे. या सीरीज अंतर्गत 210W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा Redmi Note 12 Explorer देखील लाँच केला जाईल. 210W फास्ट चार्जिंग ऑफर करणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल.
हे सुद्धा वाचा : Samsung युजर्ससाठी महत्त्वाचे! दुरुस्तीच्या दुकानात डेटा चोरीला जाण्याचे टेन्शन उरणार नाही, फक्त ही सेटिंग करा
Redmi Note 12 सिरीज स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता लॉन्च होईल. हा कार्यक्रम कंपनीच्या Weibo हँडलवर स्ट्रीम केला जाईल. आत्तापर्यंत, चीनच्या बाहेर Redmi Note 12 सिरीजसाठी कोणतीही लाँच टाइमलाइन नाही परंतु लाइन-अप येत्या काही महिन्यांत जागतिक स्तरावर पदार्पण केले जाईल. अशी अफवा आहे की कंपनी या फोनमध्ये 4300mAh बॅटरी देणार आहे, जी 210W चार्जिंगसह 9 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. हा Redmi फोन चीनमध्ये लॉन्च होणार आहे. यानंतर ते भारतासह इतर बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात येईल.
फोनमध्ये कंपनी 6.7-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले देऊ शकते. फोन 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज या एकाच व्हेरिएंट येऊ शकतो. प्रोसेसर म्हणून यात डायमेंसिटी 1080 चिपसेट दिला जाईल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह तीन कॅमेरे उपलब्ध असतील. Redmi चा हा नवीन फोन Android 12 वर आधारित MIUI 12 वर काम करेल. फोनच्या किंमतीबाबत निश्चितपणे काहीही सांगता येणार नाही.
त्याबरोबरच यामध्ये, 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो स्नॅपरसह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर, कंपनी आकर्षक सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देऊ शकते. तसेच, या सिरीजमधील हा सर्वात महागडा फोन असेल, असे मानले जात आहे. Redmi Note 12 Explorer Edition फक्त मिडनाईट डार्क कलर पर्यायामध्ये होऊ शकते.