Redmi चा जगातील सुपरफास्ट चार्जिंग फोन ! अवघ्या 9 मिनिटात होणार फुल चार्ज, मिळेल 200MP कॅमेरा

Redmi चा जगातील सुपरफास्ट चार्जिंग फोन ! अवघ्या 9 मिनिटात होणार फुल चार्ज, मिळेल 200MP कॅमेरा
HIGHLIGHTS

Redmi Note 12 सीरीज अखेर बाजारात लाँच

210W पर्यंत फास्ट चार्जिंगसह जगातील सुपरफास्ट चार्जिंग फोन

त्याबरोबरच, मिळेल 200MP पर्यंत कॅमेरा

Redmi Note 12 सिरीज बाजारात दाखल झाली आहे. कंपनीच्या नवीन सीरिजमध्ये Redmi Note 12, Note 12 Pro आणि Note 12 Pro+ यांचा समावेश आहे. या हँडसेट व्यतिरिक्त, कंपनीने Redmi Note 12 Pro Explorer Edition आणि Redmi Note 12 Trend Edition देखील लाँच केले आहे. कंपनीने ही सिरीज नुकतेच चीनमध्ये लॉन्च केली आहे. विशेषतः हे नवीन Redmi फोन 12GB पर्यंत RAM आणि 210W फास्ट चार्जिंगसह येतात. कंपनीचा दावा आहे की, या चार्जिंग टेक्नॉलॉजीमुळे फोन 9 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. तसेच, या फोनमध्ये 200MP पर्यंतचा प्रायमरी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : 5G Mobile Phones : बघा रु. 15,000 अंतर्गत 5 सर्वोत्कृष्ट 5G फोन्सची यादी, मिळतील जबरदस्त फीचर्स

Redmi Note 12 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये कंपनी 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच लांबीचा फुल HD सॅमसंग डिस्प्ले देत आहे. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. 8GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेजसह, हा फोन स्नॅपड्रॅगन 4G Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी  कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. तसेच, सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. 512GB पर्यंत मायक्रो SD कार्डला सपोर्ट करणारा, हा फोन 5000mAh बॅटरीने समर्थित आहे, जो 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Redmi Note 12 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

हा Redmi फोन 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंच फुल एचडी + OLED डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये आढळणारा हा डिस्प्ले HDR10+ ला 120Hz च्या रिफ्रेश रेटसह आणि 240Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन 12 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256 GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेजसह लाँच केला आहे. प्रोसेसर म्हणून यामध्ये MediaTek Dimensity 1080 चिपसेट देण्यात आला आहे. 

 फोनच्या मागील बाजूस कंपनी 50-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा देत आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जो 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

किंमत : 

 चीनमध्ये Redmi Note 12 ची सुरुवातीची किंमत 1199 युआन म्हणजेच सुमारे 13,600 रुपये आहे आणि Note 12 Pro ची सुरुवातीची किंमत 1699 युआन म्हणजेच सुमारे 19,300 रुपये आहे. तर, Redmi Note 12 Pro + ची किंमत 2099 युआन म्हणेजच सुमारे 23 हजार रुपयांपासून सुरू होते. Redmi Note 12 Pro Explorer आणि Trend Edition 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेजच्या एकाच व्हेरिएंटमध्ये येतात. त्यांची किंमत अनुक्रमे 2399 युआन म्हणजेच सुमारे 27 हजार रुपये आणि 2599 युआन म्हणजेच सुमारे 29,500 रुपये आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo