प्रतीक्षा संपली ! Redmi Note 12 Series अखेर भारतात लॉन्च, बघा किंमत…
Redmi Note 12 Series अखेर भारतात लाँच झाली आहे.
या सिरीजमधील तिन्ही फोन्सना 5G सपोर्ट देण्यात आला आहे.
या सिरीजची सुरुवातीची किंमत 15,499 रुपये आहे.
Xiaomi ने भारतात Redmi Note 12 सीरीज लाँच केली आहे. Redmi Note 12 सीरीज अंतर्गत तीन फोन लॉन्च करण्यात आले आहेत. ज्यामध्ये Redmi Note 12, Redmi Note 12 pro, Redmi Note 12 pro plus यांचा समावेश आहे. या तिन्ही फोनचे लाँचिंग नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात झाले. Redmi Note 12 ची सुरुवातीची किंमत रु. 17,999 आहे, Redmi Note 12 Pro+ ची सुरुवातीची किंमत रु. 29,999 आणि Redmi Note 12 Pro ची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आहे.
हे सुद्धा वाचा : 6GB रॅम आणि 5000mAh बॅटरीसह Vivo Y53t 5G लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Redmi Note 12, Redmi Note 12 pro, Redmi Note 12 pro plus सह 5G सपोर्ट देण्यात आला आहे. आजच्या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे Xiaomi इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. जॅन 2020 पासून ग्लोबल मॅनेजिंग डायरेक्टरची ते भूमिका सांभाळत आहेत.
Redmi Note 12 Pro किंमत :
Redmi Note 12 Pro ची 128GB स्टोरेजसह 6GB RAM साठी 24,999 रुपये, 128GB स्टोरेजसह 8GB RAM साठी 26,999 रुपये आणि 256GB स्टोरेजसह 8GB रॅमसाठी 27,999 रुपये किंमत आहे. बँक ऑफरसह, फोनची प्रारंभिक किंमत 20,999 रुपये असेल. या फोनची विक्री 11 जानेवारीपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या साइटवरून होईल.
Redmi Note 12 किंमत :
Redmi Note 12 ची किंमत 128 GB स्टोरेजसह 4 GB RAM साठी 15,499 रुपये आहे, 128 GB स्टोरेजसह 6 GB RAM साठी 19,999 रुपये आहे. त्याबरोबरच, ऑफरसह कमी किंमतीत फोन खरेदी करण्याची संधी असेल.
Redmi Note 12 Pro+ किंमत :
या फोनची किंमत 128GB स्टोरेजसह 8GB रॅमसाठी 29,999 रुपये आणि 256GB स्टोरेजसह 12GB रॅमसाठी 32,999 रुपये आहे. ऑफरसह, दोन्ही मॉडेल्सना 11 जानेवारी रोजी पहिल्या सेलमध्ये अनुक्रमे 25,999 आणि 28,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile