Redmi च्या 5G फोनवर मिळतेय प्रचंड सवलत, ऑफरचा शेवटचा दिवस

Redmi च्या 5G फोनवर मिळतेय प्रचंड सवलत, ऑफरचा शेवटचा दिवस
HIGHLIGHTS

फ्लिपकार्टवर समर सेव्हर डेज सेल 2023 सुरु

Redmi Note 12 Pro Plus 5G वर सर्वोत्तम ऑफर्स

फोनमध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा मिळणार आहे.

फ्लिपकार्टवर सध्या बऱ्याच उपकरणांवर उत्तम डील्स ऑफर केले जात आहेत. कारण सध्या फ्लिपकार्टवर समर सेव्हर डेज सेल 2023 सुरु आहे. सेलदरम्यान, Redmi च्या 5G फोनवर मिळतेय प्रचंड सवलत मिळत आहे. ही सेल आज म्हणजेच 17 एप्रिल रोजी रात्री 12 वाजतापर्यंत लाईव्ह असणार आहे. Redmi Note 12 Pro Plus 5G वर सर्वोत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती घेऊयात- 

Redmi Note 12 Pro Plus 5G वरील ऑफर्स  

Redmi Note 12 Pro Plus 5G स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 11% डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या डिस्काउंटसह स्मार्टफोन 29,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. फोनची MRP 33,999 रुपये आहे. तसेच, फोनवर मोठी एक्सचेंज ऑफर मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फ्लिपकार्ट सेलमध्ये या फोनवर तब्बल 28,250 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. 

मात्र, या ऑफरचा संपूर्ण लाभ मिळण्यासाठी तुमचा जुना किंवा विद्यमान फोन उत्तम स्थितीत असणे आवश्यक आहे. याशिवाय, काही निवडक मॉडेल्सवर 2000 रुपयांची एक्सट्रा एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. अशाप्रकारे, तुम्हाला हा फोन तुमच्या बजेट किमतीपेक्षाही कमी किमतीत मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी तुम्ही फ्लिपकार्टला भेट देऊ शकता. 

Redmi Note 12 Pro Plus 5G

Redmi Note 12 Pro Plus 5G फोन 6.6 इंच लांबीच्या फुल HD डिस्प्लेसह येतो. त्यासोबतच, फोन Mediatek Dymensity 1080 चिपसेटसह येईल. फोनमध्ये चार्जिंगसाठी 4980mAh ची बॅटरी उपलब्ध आहे. याव्यक्तिरिक्त, फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा मिळणार आहे. 8MPचा अल्ट्रा वाईड अँगल आणि 2MPचा मॅक्रो कॅमेरा दिला गेला आहे. सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी समोरील बाजूस 16MP चा कॅमेरा मिळेल. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo