Limited Time Deal! 200MP कॅमेरासह येणाऱ्या Redmi 12 Pro+ 5G वर मिळतोय प्रचंड Discount, बघा आकर्षक ऑफर     

Limited Time Deal! 200MP कॅमेरासह येणाऱ्या Redmi 12 Pro+ 5G वर मिळतोय प्रचंड Discount, बघा आकर्षक ऑफर     
HIGHLIGHTS

Flipkart वर Winter Fest दरम्यान Xiaomi च्या काही स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट

सध्या Redmi Note 12 Pro+ 5G स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

निवडक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे 3000 रुपयांची सवलत

Xiaomi आपली आगामी Redmi Note 13 सिरीजच्या लाँचची तयारी करत असताना मागील मॉडेलवर उत्तम ऑफर्स सादर केले जात आहे. होय, Flipkart वर Winter Fest दरम्यान Xiaomi च्या काही स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. लक्षात घ्या की, हा सेल 23 तारखेपासून सुरु झालेला असून 31 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, सध्या Redmi Note 12 Pro+ 5G स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. चला तर मग जाणून घेऊयात Redmi Note 12 Pro Plus वरील जोरदार ऑफर्स-

Redmi Note 12 Pro+ 5G वरील ऑफर्स

Redmi Note 12 Pro+ 5G चा बेस व्हेरिएंट म्हणजेच 8GB + 256GB व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेले टॉप-एंड मॉडेल 30,999 रुपयांना सूचीबद्ध आहे. या फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास Flipkart वरील ‘विंटर फेस्ट’ सेल दरम्यान ग्राहकांना निवडक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे 3000 रुपयांची सवलत मिळणार आहे.

Redmi Note 12 Pro+ Flipkart Discount

एवढेच नाही तर, या फोनवर 24,400 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळतेय. तर, सहज खरेदी करण्यासाठी ग्राहक नो-कॉस्ट EMI ऑफरचा लाभ देखील घेऊ शकतात. हा फोन आर्क्टिक व्हाइट, आइसबर्ग ब्लू आणि ऑब्सिडियन ब्लॅक या तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

Redmi Note 12 Pro+ 5G

Redmi Note 12 Pro+ 5G स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले ऑफर करतो. उत्तम परफॉर्मन्ससाठी यामध्ये 6nm MediaTek Dimensity 1080 CPU आणि ARM Mali-G68 MC4 GPU समाविष्ट आहे. डिव्हाइस MIUI 13 वर चालेल, जे Android 12 वर आधारित आहे. ऑप्टिक्ससाठी, या हँडसेटमध्ये 200MP प्रायमरी, 8MP अल्ट्रावाइड आणि 2MP मॅक्रो रिअर लेन्स आणि 16MP सेल्फी शूटर आहे. तर, फोनला पॉवर देण्यासाठी 4,980mAh बॅटरी आहे, जी 120W HyperCharge चार्जिंगला सपोर्ट करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo