Redmi Note 12 Pro 5G: 12GB RAM आणि अप्रतिम फीचर्ससह नवा व्हेरिएंट लाँच, जाणून घ्या किमंत

Redmi Note 12 Pro 5G: 12GB RAM आणि अप्रतिम फीचर्ससह नवा व्हेरिएंट लाँच, जाणून घ्या किमंत
HIGHLIGHTS

Redmi ने भारतात आपल्या Redmi Note 12 Pro 5G चा नवीन स्टोरेज व्हेरिएंट लाँच केला आहे.

12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह Redmi Note 12 Pro 5G चा नवा व्हेरिएंट लाँच

50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा चांगल्या तपशिलांसह उच्च-रिझोल्यूशन फोटो घेतो आणि उत्तम कलर्स एक्सपेरियन्स देतो.

लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँड Redmi ने भारतात आपल्या Redmi Note 12 Pro 5G चा नवीन स्टोरेज व्हेरिएंट लाँच केला आहे. हा फोन यावर्षी जूनमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन पूर्वी दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र त्यानंतर, या फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया फोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स…

Redmi Note 12 Pro 5G: नवीन व्हेरियंटची किंमत

Redmi ने 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह Redmi Note 12 Pro 5G चा नवा व्हेरिएंट लाँच केला आहे, ज्याची किंमत 28,999 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, याआधी लाँच केलेल्या स्मार्टफोनच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. तर, 8GB RAM + 128GB स्टोरेजची किंमत 24,999 रुपये आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे.

 Redmi Note 12 Pro 5G फ्रॉस्टेड ब्लू, स्टारडस्ट पर्पल आणि ऑनिक्स ब्लॅक शेड्समध्ये सादर करण्यात आला आहे.  हे फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर देखील सेलसाठी उपलब्ध आहे.

Redmi Note 12 Pro 5G: तपशील 

फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा फुल-HD AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. AMOLED डिस्प्ले कमी उर्जा वापरतो, अधिक स्पष्ट चित्र गुणवत्ता ऑफर करतो आणि LCD सारख्या इतर डिस्प्ले तंत्रज्ञानाच्या तुलनेत फास्ट स्पीड रिस्पॉन्स देतो. फोनमध्ये डिस्प्लेसोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देखील आहे. 

हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 प्रोसेसर आणि 12GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेजसह सुसज्ज आहे. या प्रोसेसरमध्ये 4000 रिझोल्युशनचे HDR व्हिडिओ रेकॉर्डिंग इंजिन देण्यात आले आहे. या प्रोसेसरमध्ये अनेक पॉवर-सेव्हिंग फायदे उपलब्ध आहेत, जे डिव्हाइसच्या बॅटरीला दीर्घकाळ टिकण्यास मदत करतात.

Redmi Note 12 Pro च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा चांगल्या तपशिलांसह उच्च-रिझोल्यूशन फोटो घेतो आणि उत्तम कलर्स एक्सपेरियन्स देतो. नाईट साइट तुम्हाला डार्क सेटिंग्जमध्ये चांगली चित्रे मिळविण्यास मदत करेल. फोनच्या फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. या फ्रंट कॅमेरासह तुम्ही निश्चितपणे उत्तम सेल्फी घेऊ शकता आणि सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशनसह फोटो लो लाईटमध्येही स्पष्ट दिसतील.

Redmi Note 12 Pro 5G मध्ये 5,000mAh बॅटरी आहे आणि 67W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. मोठ्या बॅटरी क्षमतेचे स्मार्टफोन सामान्य वापरावर एक दिवसापेक्षा जास्त बॅटरी लाईफ देतात. तसेच, ते अधिक स्क्रीन टाइमसह परफॉर्मन्स वाढवतात. 5,000mAh किंवा त्यावरील मोबाइल फोन स्क्रीनवर जास्त वेळ घालवणाऱ्या गेमरसाठी योग्य आहेत. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo