Redmi Note 12 सिरीज लवकरच भारतात लाँच होणार आहे. यामध्ये कंपनी Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro Plus 5G लाँच करेल असे बोलले जात आहे. या सर्व स्मार्टफोन्सपैकी, Redmi Note 12 Pro 5G च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सची कंपनीने पुष्टी केली आहे. तर या सिरीजमध्ये, Redmi Note 12 Pro Plus 5G हा लाइनअपचा टॉप व्हेरिएंट असेल.आता कंपनीने Redmi Note 12 Pro 5G बाबत एक मोठे अपडेट दिले आहे.
हे सुद्धा वाचा : BSNL : 6 महिन्यांसाठी दररोज 2GB डेटा, 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत जबरदस्त प्लॅन
Redmi Note 12 5G सीरीज भारतात 5 जानेवारी रोजी लॉन्च होणार आहे. लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने या सीरीजच्या प्रसिद्ध स्मार्टफोन Redmi Note 12 Pro 5G चे कॅमेरा डिटेल्स एका पोस्टद्वारे शेअर केले आहेत. असे सांगण्यात आले आहे की, ब्रँड Redmi Note 12 Pro 5G मध्ये IMX766 सेंसर कॅमेरा देखील प्रदान करणार आहे. कंपनीने Redmi Note 12 Pro Plus 5G मध्ये 200-मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची पुष्टी आधीच केली होती.
https://twitter.com/atytse/status/1609087764913586176?ref_src=twsrc%5Etfw
कंपनी Redmi Note 12 Pro 5G मध्ये IMX766 सेन्सर पुन्हा आणत आहे, असे लेटेस्ट अपडेटमध्ये समोर आले आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, डायनॅमिक आणि आकर्षक फोटो कॅप्चर करण्यासाठी तुमची दृष्टी जिवंत करण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचे परिपूर्ण संयोजन आवश्यक आहे. ही पोस्ट Xiaomi ग्लोबलचे उपाध्यक्ष Alvin Tse यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. यासोबतच एल्विनने सायकलस्वाराचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये कॅमेरा कॉलिटीचाही अंदाज लावला जाऊ शकतो. यामध्ये F/2.2 अपर्चर डिटेल्स देखील पाहता येतील.
यापूर्वी, कंपनीने ट्विटरवर एका पोस्टद्वारे Redmi Note 12 सिरीजच्या लॉन्च तारखेची पुष्टी केली होती. या सिरीजमध्ये खास गोष्ट म्हणजे 200MP कॅमेरा मिळणार आहे. याशिवाय हा फोन अनेक आकर्षक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असेल, असेही सांगण्यात आले आहे. Xiaomi ने त्यांच्या भारतीय वेबसाइटवर फोनसाठी खास लँडिंग पेज लाइव्ह देखील केला आहे. जर तुम्हाला त्याचे लाँच लाईव्ह पहायचे असेल, तर कंपनीने त्यासाठी Notify Me बटण दिले आहे. जेणेकरून तुम्हाला लॉन्चच्या वेळी त्याचे अपडेट मिळू शकतील.