नुकतेच Redmi ने आपल्या Redmi Note 12 4G स्मार्टफोनच्या किमतीत कपात केल्याचे जाहीर केले. त्यानंतर, आता लगेच कंपनीने Redmi Note 12 5G स्मार्टफोन स्वस्त केल्याचीही घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनी 4 जानेवारी 2024 रोजी भारतात Redmi Note 13 5G सीरीज लाँच करणार आहे. ही सिरीज येण्यापूर्वी कंपनीने Redmi Note 12 चे 4G आणि 5G मॉडेल स्वस्त केले आहेत. चला तर मग फार वेळ न घालवता बघुयात Redmi Note 12 5G ची नवी किंमत-
वर सांगितल्याप्रमाणे, अलीकडेच Redmi Note 12 4G फोनची किंमत 3000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता कंपनीने Redmi Note 12 5G फोनच्या किमतीत 2,500 रुपयांची कपात नोंदवली आहे. पूर्वी स्मार्टफोनच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 17,999 रुपये होती. तर, त्याच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये होती.
मात्र, कपातीनंतर फोनची किंमत अनुक्रमे 15,499 रुपये आणि 16,999 रुपये इतकी झाली आहे. फ्रॉस्टेड ग्रीन, मॅट ब्लॅक आणि मिस्टिक ब्लू कलर ऑप्शन्स फोनमध्ये उपलब्ध आहेत.
Redmi Note 12 5G फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय, हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासह तुम्हाला 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल. सुरक्षेसाठी, यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात 3.5mm हेडफोन जॅक देखील मिळेल.
फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 48MP प्रायमरी, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर देखील आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा आहे. तुम्हाला फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.