Xiaomi सब-ब्रँड Redmi ने यावर्षी भारतात Redmi Note 12 स्मार्टफोन लाँच केला आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन हवा असेल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ज्या लोकांना Redmi फोन आवडतात, त्यांच्यासाठी कंपनीने या मोबाईलची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे. आजपासून हा Xiaomi स्मार्टफोन पूर्वीपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. जाणून घ्या फोनची नवी किंमत आणि सर्व तपशील.
Redmi Note 12 भारतात दोन मेमरी व्हेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB रॅम आहे जी 64GB स्टोरेज आणि 128 GB स्टोरेजला सपोर्ट करते. वर सांगितल्याप्रमाणे, मोबाईलची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे. त्यानंतर फोनची नवी किमंत अनुक्रमे 12,999 आणि 14,999 रुपये इतकी झाली आहे. यासह फोन तुम्ही अगदी बजेट किमतीत खरेदी करू शकता.
हा Redmi मोबाइल कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, ऑनलाइन शॉपिंग साइट्स तसेच रिटेल स्टोअर्सवर नवीन किंमतीसह विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Redmi Note 12 स्मार्टफोन Sunrise Gold, Lunar Black आणि Ice Blue कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.
फोनमध्ये 6.67 इंच लांबीचा मोठा पंच-होल डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. हे सुपर AMOLED पॅनेलवर तयार केले आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 685 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. त्याबरोबरच, हा Redmi फोन 2 वर्षांच्या Android अपडेट्स आणि 4 वर्षांच्या सुरक्षा अपडेट्ससह येतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या स्मार्टफोनमध्ये 5GB व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.
फोटोग्राफीसाठी, त्याच्या मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. आकर्षक सेल्फीसाठी समोर 13 मेगापिक्सेल सेल्फी सेन्सर आहे.