Redmi Note 13 सीरीजच्या लाँचपूर्वी Redmi Note 12 झाला स्वस्त, जाणून घ्या नवी Special प्राईस। Tech News

Updated on 02-Jan-2024
HIGHLIGHTS

Redmi Note 13 सीरीज भारतात 4 जानेवारीला लाँच होणार

नवी सिरीज लाँच होण्यापूर्वी Redmi Note 12 4G स्मार्टफोनच्या किमतीत कपात

आता कंपनीने या फोनची किंमत 3000 रुपयांनी कमी केली आहे.

Redmi Note 13 सीरीज भारतात अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच 4 जानेवारीला लाँच होणार आहे. नवीन सीरीज लाँच होण्यापूर्वी कंपनीने Redmi Note 12 4G स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. Redmi चा हा फोन एक बजेट स्मार्टफोन आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, फोटोग्राफीसाठी, यात 50MP Samsung ISOCELL JN1 प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची नवी किंमत-

हे सुद्धा वाचा: Important! Aadhaar Card मध्ये बदल करण्यासाठी द्यावे लागतील पैसे? बघा नव्या वर्षातील नवे नियम। Tech News

Redmi Note 12 4G ची नवी किंमत

कंपनीने Redmi Note 12 4G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. पूर्वी या फोनच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये होती. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये होती. मात्र, आता कंपनीने या फोनची किंमत 3000 रुपयांनी कमी केली आहे.

REDMI NOTE 12

कपातीनंतर, आता फोनचा 64GB स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर, 128GB स्टोरेज मॉडेल 13,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन Lunar Black, Sunrise Gold आणि Ice Blue या कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Redmi Note 12 4G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 12 4G फोनमध्ये 6.67-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. याव्यतिरिक्त, हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह देखील उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा फोन Snapdragon 685 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासह 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल, फोनचे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येते. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

कॅमेरा विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi Note 12 4G फोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. यात 50MP Samsung ISOCELL JN1 प्राथमिक कॅमेरा आहे. यासोबतच, फोनमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओसाठी 16MP कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :