सध्या मोबाईल निर्माते बजेट स्मार्टफोन बनवण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येत आहे. Redmi Note 12 4G आणि Redmi 12C भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. हे फोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत लॉन्च करण्यात आले आहेत. चला तर मग नव्या बजेट स्मार्टफोन्सबद्दल सविस्तर माहिती घेऊयात…
Redmi 12C च्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. त्याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. बँक ऑफरसह 500 रुपयांची सूट दिली जात आहे. यानंतर, फोनची किंमत अनुक्रमे 8,499 रुपये आणि 10,499 रुपये असेल.
Redmi Note 12 4G ची भारतात किंमत 14,999 रुपये आहे. हे त्याच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह येते. फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. बँक ऑफरनंतर, या फोनची किंमत अनुक्रमे 13,999 रुपये आणि 15,999 रुपये असेल.
दोन्ही फोन 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध केले जातील. ते Flipkart, Amazon, Mi वेबसाइट, Mi Home स्टोअर्स आणि रिटेल आउटलेटवरून खरेदी केले जाऊ शकतात.
Redmi Note 12 4G फोनमध्ये 6.67-इंचाचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट ऑफर केले जात आहेत.फोनमध्ये पंच होल कटआउट डिझाइन दिसत आहे. Redmi Note 12 4G फोन Qualcomm Snapdragon 685 प्रोसेसरने सुसज्ज आहे. Redmi Note 12 4G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये युजरला 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.