Redmi Note 11SE 26 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होण्यासाठी सज्ज, पहा डिटेल्स

Updated on 24-Aug-2022
HIGHLIGHTS

Redmi Note 11SE लवकरच लाँच होणार

स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार

यात 5,000mAh ची बॅटरी मिळत आहे, जी 33W चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 11SE 26 ऑगस्ट रोजी सादर केला जाईल. कंपनीने ट्विटर पोस्टद्वारे याची घोषणा केली आहे. हा Redmi फोन Redmi Note 10S चा रीर्ब्रँडेड वर्जन आहे, जो भारतात आधीच उपलब्ध आहे. Redmi Note 11SE ची मायक्रोसाइट Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह आहे. स्पेक्स, कलर ऑप्शन, डिझाइन, Flipkart उपलब्धता आणि विक्रीची तारीख यात दिसून येते. यात Redmi Note 11SE च्या बॉक्स कंटेंटचा देखील खुलासा झाला आहे.

हे सुद्धा वाचा : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Samsung चा नवीन फोन लाँच, किंमतही कमी

Redmi Note 11SE चे रिटेल पॅकेज अनबॉक्स केल्यावर आपल्याला USB Type-C केबल, एक सिम इजेक्ट टूल, एक प्रोटेक्टिव्ह केस, एक क्विक कार्ड गाईड, एक वॉरंटी कार्ड आणि डिव्हाइस दिसेल.

रेडमी नोट 11SE सेल

Redmi Note 11SE थंडर पर्पल, कॉस्मिक व्हाइट, शॅडो ब्लॅक आणि बिफ्रॉस्ट ब्लू या चार कलर ऑप्शनसह येईल. हा फोन 6GB/64GB, 6GB/128GB आणि 8GB/128GB या व्हेरिएंटसह येणार आहे. Redmi Note 11SE प्रथम 31 ऑगस्ट रोजी फ्लिपकार्ट आणि Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. Redmi Note 11SE ची किंमत अद्याप समोर आलेली नाही.

Redmi Note 11SE

Redmi Note 11SE मध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.43-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे आणि त्याची ब्राइटनेस 1100 nits आहे. या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio 695 चिपसेटद्वारे समर्थित आहे. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळत आहे जी 33W चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 11SE च्या फोटोग्राफीमध्ये 13MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे.  ज्यामध्ये 64MP प्रायमरी, 8MP अल्ट्रावाइड, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. हा फोन 3.5mm हेडफोन जॅक आणि IR ब्लास्टरसह येतो. सिक्योरिटीसाठी, तुम्हाला साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक फिचर मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :