14,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Redmi Note 11 SE लाँच, मिळेल 64MP कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग बॅटरी

Updated on 26-Aug-2022
HIGHLIGHTS

Redmi Note 11 SE भारतात लाँच

नव्या स्मार्टफोनची किंमत किंमत 13,499 रुपये

हा स्मार्टफोन भारतात पहिल्यांदा 31 ऑगस्ट रोजी विक्रीसाठी उपलब्ध होणार

Xiaomi ने भारतात आपला नवीन बजेट फोन Redmi Note 11 SE लाँच केला आहे. हा फोन Redmi Note 10S चा रिब्रँडेड वर्जन आहे. फोनमध्ये, तुम्हाला 64MP क्वाड रियर कॅमेरा सेटअप, MediaTek Helio G95 चिपसेट, ड्युअल स्टीरिओ स्पीकर, 33W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh बॅटरी मिळेल. जाणून घेऊयात फोनची किंमत, सेल  तारीख आणि लाँच ऑफरशी संबंधित सर्व तपशील… 

हे सुद्धा वाचा : Liger BO Collection Day 1 : चित्रपटाची सुरुवात उत्तम, परंतु हिंदी बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी नाही

Redmi Note 11SE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 11SE मध्ये ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह 6.43-इंच लांबीचा सुपर AMOLED डॉट डिस्प्ले असेल. त्याचा डिस्प्ले 2400 x 1080 FHD + रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. Redmi च्या या बजेट गेमिंग फोनमध्ये 1100 nits पर्यंत पीक ब्राइटनेस उपलब्ध आहे. फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि AI फेस अनलॉक सिक्योरिटी फिचरद्वारे सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G95 चिपसेटद्वारे समर्थित आहे.

Redmi Note 11SE 5,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जी 33W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की स्मार्टफोन फक्त 30 मिनिटांत 0-54 टक्के चार्ज होऊ शकतो. त्याबरोबरच, स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये 64MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 13MP सेल्फी कॅमेरा आहे.

Redmi Note 11 SE ची भारतातील किंमत आणि विक्री ऑफर

Redmi Note 11SE फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. फोनच्या 6GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही हा फोन Biforst Blue, Cosmic White, Space Black आणि Thunder Purple या चार कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकता.  Note 11 SE भारतात पहिल्यांदा 31 ऑगस्ट रोजी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्डवर 1000 रुपयांची सूट मिळेल. तुम्ही 468 रुपयांच्या EMI वर देखील फोन खरेदी करू शकता.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :