स्मार्टफोन 22 जुलैपासून Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध होईल
Redmi Buds 3 Lite देखील आज लाँच होणार
Redmi K50i 5G आज दुपारी 12 वाजता भारतात दाखल होणार आहे. लाँच इव्हेंट Xiaomi इंडियाच्या Twitter, YouTube, Facebook आणि Instagram अकाउंटद्वारे तसेच त्याच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल. हा स्मार्टफोन फँटम ब्लू, क्विक सिल्व्हर आणि स्टेल्थ ब्लॅक या तीन कलर ऑप्शन्समध्ये सादर केला जाईल. मागील अहवालानुसार, स्मार्टफोन 22 जुलैपासून Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध होईल. चला तर मग या फोनचे संभाव्य फीचर्स आणि किंमतीशी संबंधित प्रत्येक तपशील जाणून घेऊयात…
Redmi K50i च्या बेस व्हेरिएंटची किंमत 24,000 रुपयांपासून सुरू होईल. तर हाय व्हेरिएंटची किंमत 28,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र, हा केवळ एक अंदाज आहे. फोनची नेमकी किंमत आज 12 वाजता लाँच झाल्यानंतरच कळेल.
Redmi K50i ची संभाव्य फीचर्स
Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये डॉल्बी व्हिजन टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणारा डिस्प्ले आहे. फोन MediaTek Dimensity 8100 SoC सह येईल, याबाबत आधीच पुष्टी झाली आहे. फोनमध्ये 5080mAh बॅटरी आहे, जी 67W टर्बो चार्जिंग सपोर्ट करेल. जो फक्त 15 मिनिटांच्या चार्जमध्ये पूर्ण दिवस चालेल, अशी अपेक्षा आहे. आगामी Redmi K50i 5G मध्ये 64-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेरासह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील असेल.
Redmi Buds 3 Lite देखील आज लाँच होणार
Xiaomi Redmi K50i सोबत इव्हेंटमध्ये Redmi Buds 3 Lite ट्रू वायरलेस इयरफोन देखील लाँच होऊ शकते. कंपनीने ट्विटरवर पोस्ट केलेल्या टीझरनुसार, या इन-इअर TWS इयरफोनची किंमत अगदी परवडणारी असेल. कंपनीच्या स्वतःच्या प्री-लाँच टीझरनुसार, हे डिवाइस 18 तासांपर्यंत बॅटरीचे लाईफ, एन्व्हरमेंटल नॉइज कॅन्सिलेशन, USB टाइप-C फास्ट चार्जिंग आणि IP54 रेटिंगसह ऑफर केले जाईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.