कंपनीने मागील वर्षी Redmi A1 आणि A1 Plus जागतिक बाजारपेठेत सादर केले होते.
गेल्या वर्षी, Xiaomi ने Redmi A1 आणि A1+ बजेट स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केले. यानंतर POCO C50 भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला, जो A1+ स्मार्टफोनची रीब्रँडेड आवृत्ती आहे. आता कंपनी आपले दोन नवीन बजेट डिव्हाइसेस Redmi A2 आणि Redmi A2+ लवकरच भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे, जे अलीकडे BIS प्रमाणपत्र वेबसाइटवर पाहिले गेले होते.
Redmi ने Redmi A1+ स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सादर केला होता. भारतीय बाजारपेठेत त्याची किंमत 8 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.52-इंच लांबीचा वॉटरड्रॉप नॉच HD + LCD डिस्प्ले आहे. त्याची स्क्रीन रिझोल्यूशन 1600 x 720 पिक्सेल आहे आणि आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. त्याचा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश आणि 120Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.
उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी Redmi A1 Plus मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पहिला 8MP मुख्य सेन्सर आणि दुसरा QVGA सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसमध्ये 5MP कॅमेरा आहे.
पॉवरसाठी, स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio A22 चिपसेट आणि एक मोठी 5000mAh बॅटरी आहे, जी 10W फास्ट चार्जिंगच्या मदतीने चार्ज केली जाऊ शकते. याशिवाय फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-C पोर्ट सारखे स्पेक्स उपलब्ध आहेत.
मात्र, Xiaomi ने अद्याप Redmi A2 आणि A2 Plus च्या लॉन्च किंवा किंमतीशी संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही. अशा परिस्थितीत आगामी दोन्ही स्मार्टफोन्स किती दिवसात लॉन्च केले जातील हे सांगणे कठीण आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.