Redmi K60 सिरीज चीनमध्ये काही आठवड्यांपूर्वीच लॉन्च झाली आहे. Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60E Redmi K60 सीरीज अंतर्गत लॉन्च करण्यात आले आहेत. आता हे तिन्ही फोन भारतातही येण्यासाठी सज्ज आहेत, लॉन्चिंगची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली, नसली तरी Xiaomi ने फोनच्या संभाव्य किंमतीबद्दल माहिती दिली आहे.
हे सुद्धा वाचा : Jio ची 5G सेवा आणखी चार शहरांमध्ये सुरू, तुमचे शहर आहे का 'या' यादीत ?
Redmi K60 Pro मध्ये 6.67-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले उपलब्ध आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्ले 1,400 nits ब्राइटनेस आणि HDR10+ सपोर्टसह येतो. Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह फोनमध्ये 512 GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज आणि 16 GB पर्यंत LPDDR5x रॅम उपलब्ध आहे.
फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यासोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. यासोबतच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि सोनी IMX800 सेन्सरसाठी सपोर्ट आहे. सेकंडरी सेन्सर 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आहे आणि तिसरा कॅमेरा 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
Redmi K60 Pro सह 5,000mAh बॅटरी उपलब्ध आहे, जी 120W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 30W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये Wi-Fi 6, 5G, NFC आणि ब्लूटूथ v5.3 सपोर्ट आहे.
Redmi K60 सिरीजची सुरुवातीची किंमत भारतात सुमारे 30,000 रुपये असू शकते. Xiaomi ने Redmi Note 12 सीरीज लाँच करताना फोनच्या संभाव्य किंमतीबद्दल माहिती दिली आहे. Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60E चीनमध्ये CNY 2,499 म्हणजेच अंदाजे रु. 30,000, CNY 3,299 म्हणजेच अंदाजे रु. 40,000 आणि CNY 2,199 म्हणजेच अंदाजे रु. 26,000 च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आले आहेत.