लॉन्चपूर्वी मोठा खुलासा! ‘ही’ असेल Redmi K50i ची किंमत, मिळतील जबरदस्त फीचर्स

लॉन्चपूर्वी मोठा खुलासा! ‘ही’ असेल Redmi K50i ची किंमत, मिळतील जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

लाँचपूर्वी Redmi K50i 5G ची किंमत लीक

Redmi K50iची इंडियामध्ये किंमत 26,999 रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता

फोन 22 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

स्मार्टफोन कंपनी Redmi लवकरच भारतात एक अतिशय उत्तम फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. परंतु या लाँचपूर्वीच, भारतात Redmi K50i ची किंमत आणि विक्री तारखेची माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. एका नवीन अहवालानुसार, Redmi K50i ची किंमत भारतात 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल,अशी माहिती मिळाली आहे. लीक झालेल्या किमतीचे डिटेल्स योग्य असल्यास, Redmi K50i ची स्पर्धा OnePlus Nord 2T 5G, Poco F4 5G, iQOO Neo 6 5G शी होईल.

हे सुद्धा वाचा : INFINIX : आज येणार 108MP चे स्मार्टफोन, किंमतही असेल कमी, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

अपेक्षित किंमत 

MySmartPrice ने दावा केला आहे की, Redmi K50iची इंडियामध्ये किंमत 26,999 रुपयांपासून बेस मॉडेलसाठी सुरू होईल, ज्यामध्ये 6GB RAM आणि 128GB अंतर्गत स्टोरेज असेल. तसेच, भारतात 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 29,000 ते 33,000 रुपयांच्या दरम्यान असेल, अशी माहिती मिळाली आहे. 

'या' तारखेला विक्रीसाठी होणार उपलब्ध 

Redmi K50i, जो रीबॅज केलेला Poco X4 GT/ Redmi Note 11T Pro 5G आहे. हा फोन स्टेल्थ ब्लॅक, क्विक सिल्व्हर आणि फँटम ब्लू. तीन  ऑप्शन्समध्ये लाँच होईल. फोन 22 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. हा फोन Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध असेल. Mi Home स्टोअर्स आणि रिटेल स्टोअर्समधून ग्राहक Redmi K50i खरेदी करू शकतील. लाँच ऑफर्स अंतर्गत, फोन HDFC बँक कार्ड ऑफरसह येईल.

Redmi K50i 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi K50i मध्ये 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह 6.6-इंच लांबीचा IPS LCD असेल. फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यासाठी टॉप सेंटरमध्ये एक होल-पंच कटआउट सपोर्ट आहे. यात MediaTek Dimensity 8100 SoC देखील आहे. डिव्हाइसला 5080 mAh बॅटरी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह समर्थित असेल.

मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. फोनमध्ये 64MP मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर असेल. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा असेल. Redmi K50i आउट ऑफ द बॉक्स Android 12 वर आधारित MIUI 13वर चालेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo