मागील वर्षी Redmi K50i स्मार्टफोन जुलैमध्ये भारतात लाँच झाला होता. आता जवळपास वर्षभरानंतर कंपनीने ऑफर अंतर्गत या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. Redmi India ने ट्विटरच्या माध्यमातून या फोनची डिस्कॉउंटेड किंमत अनाउंस केली आहे. जाणून घ्या फोनची नवी किंमत –
Redmi India ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे Redmi K50i स्मार्टफोनची नवीन डिस्कॉउंटेड किंमत जाहीर केली आहे. पोस्टनुसार, आता यूजर्स ऑफर अंतर्गत हा फोन 18,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतील. ही किंमत फोनच्या बेस व्हेरिएंटची असण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/RedmiIndia/status/1664160885508567041?ref_src=twsrc%5Etfw
तसेच, ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे फोनवर 1,500 रुपयांची झटपट कॅशबॅक ऑफर देखील देण्यात आली आहे. Redmi K50i च्या 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत 25,999 रुपये आहे. तर फोनच्या 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत 28,999 रुपये आहे.
स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. खरं तर, हा फोन डॉल्बी व्हिजन डिस्प्ले सह येतो. तसेच, यामध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आहे. फोनचा बेस व्हेरिएंट 6GB रॅमसह 128GB स्टोरेजचा आहे. तर, टॉप व्हेरिएंट 8GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेजचा आहे.
फोटोग्राफीसाठी 64MP मेन कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 2MP थर्ड सेन्सर आहे. तर, 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi K50i स्मार्टफोनमध्ये 5080mAh बॅटरी आहे, जी 67W टर्बो चार्जिंग सपोर्टसह येते.