Redmi Go स्मार्टफोनचे रेंडर आले समोर, एंड्राइड ओरियो गो एडिशन वर होईल लॉन्च

Updated on 25-Jan-2019
HIGHLIGHTS

Redmi Go स्मार्टफोन Xiaomi चा पहिला स्मार्टफोन असेल जो एंड्राइड गो वर चालेल. हा स्मार्टफोन Redmi Note 7 सोबत भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

Xiaomi ने अलीकडेच घोषणा केली होती कि रेड्मी आता कंपनीचा एक वेगळा ब्रँड म्हणून समोर येईल आणि त्यांचा Redmi Note 7 या सब-ब्रँड मध्ये पहिला फोन म्हणून लॉन्च झाला होता. कंपनी ने टीजर जाहीर केला होता ज्यावरून माहिती मिळते कि हा स्मार्टफोन भारतात पुढील महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार अशी माहिती पण मिळते कि Redmi Note 7 Pro आणि Redmi Go पण Redmi Note 7 सोबत लॉन्च केला जाऊ शकतो आणि आता Redmi Go डिवाइसचे डिटेल्स पण इंटरनेट वर समोर येऊ लागले आहेत.

SlashLeaks द्वारा शेयर केल्या गेलेल्या लीक प्रमोशनल रेंडर वरून माहिती मिळत आहे कि स्मार्टफोन मध्ये 16:9 चा डिस्प्ले दिला जाईल ज्याच्या टॉप आणि बॉटम वर खूप जास्त बेजल्स आहेत आणि स्क्रीनच्या खाली कपॅसिटीव्ह एंड्राइड नेविगेशन बटन्स दिले जातील. डिवाइसचा बॅक लुक किनाऱ्यांवर थोडा घुमावदार वाटतो आणि याला पेबल सारखी डिजाइन देण्यात आली आहे. डिवाइसच्या मागे एक सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्याच्या सोबत एक LED फ्लॅश असेल. Redmi Go “गो स्मार्ट, डू मोर” टॅगलाइन देण्यात आली आहे.

Redmi Go चे लीक्ड स्पेसिफिकेशन आणि फीचर्स

लीक झालेल्या प्रमोशनल रेंडर वरून समोर येत आहे कि डिवाइस मध्ये 5 इंचाचा HD डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 425 क्वाड-कोर SoC ने सुसज्ज आहे. डिवाइस मध्ये 1GB रॅम आणि 8GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रो SD कार्डच्या मदतीने 128GB पर्यंत वाढवता येईल. 
फोटोग्राफी डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा असेल त्यासोबत एक LED फ्लॅश देण्यात आला आहे आणि डिवाइसच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर हा डुअल सिम कार्ड स्लॉट, Wi-Fi, ब्लूटूथ आणि माइक्रो USB पोर्ट सह येईल. स्मार्टफोन मध्ये 3,000mAh ची बॅटरी दिली जाईल. तसेच हा ब्लॅक आणि ब्लू रंगांच्या ऑप्शन मध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

रेड्मी गो एंड्राइड 8.1 ओरियो च्या गो एडिशन वर चालेल. हा शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल जो एंड्राइड गो OS वर चालेल आणि Mi A1 आणि Mi A2 नंतर तीसरा स्मार्टफोन असेल जो MIUI शिवाय येईल.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :