Redmi A5 Launch: आकर्षक डिझाईनसह नवा फोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी 

Redmi A5 Launch: आकर्षक डिझाईनसह नवा फोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी 
HIGHLIGHTS

आगामी Redmi A5 भारतात लवकरच लाँच होणार आहे.

Xiaomi चा आगामी Redmi A5 भारतात 15 एप्रिल रोजी लाँच होणार

Redmi A5 च्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 32MP चा मुख्य कॅमेरा सेन्सर असेल.

Redmi A5 Launch: जर तुम्ही देखील नवीन स्वस्त फोन खरेदी करायचा विचार करत असाल तर, थोडं थांबा… कारण Xiaomi त्यांचे नवीन लो बजेट डिव्हाइस लाँच करण्यास सज्ज झाली आहे. होय, Redmi A5 भारतात लवकरच लाँच होणार आहे. या फोनचे प्रोडक्ट पेजदेखील कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह करण्यात आले आहे. एवढेच नाही तर, कंपनीने या फोनची लाँच डेट देखील जाहीर केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Redmi A5 चे लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: Llyod ने लाँच केले नवीन AC! अवघ्या काही सेकंदातच तुमचे रूम होईल थंड, जाणून घ्या किंमत

Redmi A5 लाँचिंग डिटेल्स

Xiaomi चा आगामी Redmi A5 भारतात 15 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. एवढेच नाही तर, शाओमीने माहिती दिली आहे की, हा लो बजेट रेडमी फोन जैसलमेर गोल्ड, पाँडिचेरी ब्लू आणि जस्ट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. या फोनची अपेक्षित किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

redmi a5 launch

Redmi A5 चे अपेक्षित फीचर्स आणि स्पेक्स

Redmi A5 आधीच जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. फोनचे भारतीय स्पेसिफिकेशन्स देखील समान असण्याची शक्यता आहे. Redmi A5 स्मार्टफोनमध्ये 1640x 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.88-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही एक LCD स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटसह येईल. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन Unisoc T7250 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी या Redmi A5 च्या बॅक पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 32MP चा मुख्य कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या लो बजेटच्या रेडमी फोनमध्ये 5200mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. ही मोठी बॅटरी लवकर चार्ज करण्यासाठी, मोबाईलमध्ये 18W ची फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आहे. इतर स्पेक्सबद्दल बोलाय

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo