इंडियन मोबाईल काँग्रेस IMC 2024 इव्हेंट दरम्यान, Xiaomi ने Qualcomm च्या भागीदारीत एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन Redmi A4 5G होय. हा कंपनीचा 5G एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे, जो 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला गेला आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, विशेषतः हा फोन Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. जाणून घेऊयात किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स-
Also Read: Samsung Galaxy Ring: स्मार्टफोनच्या किमतीत भारतात लाँच झाली स्मार्ट रिंग, हेल्थ AI फीचर्ससह सज्ज
वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Redmi A4 5G फोन भारतात सादर केला आहे. सध्या फोनची नेमकी किंमत आणि लाँच डेट समोर आलेली नाही. या फोनमध्ये ब्लॅक आणि सिल्व्हर असे दोन कलर ऑप्शन्स सादर करण्यात आले आहेत. कंपनी या वर्षाच्या अखेरीस हा फोन लाँच करणार, अशी शक्यता आहे. Xiaomi इंडियाचे अध्यक्ष मुरलीकृष्णन बी यांनी सांगितले आहे की या फोनचे अधिकृत लॉन्च या वर्षाच्या अखेरीस होऊ शकते.
Redmi A4 5G फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने हा फोन Qualcomm च्या भागीदारीत सादर केला आहे. हा फोन Snapdragon 4s Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे. ऑडिओसाठी, फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आहे.
या फोनमध्ये तुम्हाला एक सपाट डिझाईन मिळणार आहे, जरी तुम्हाला यामध्ये एक राउंड कॅमेरा सेटअप मिळेल. यासोबतच इतर सेन्सर्सची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या सगळ्या व्यतिरिक्त कंपनीने फोनच्या इतर फीचर्सचा खुलासा केलेला नाही. या उपकरणासह, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरची प्रगत AI क्षमता लोकांपर्यंत आणणे हे Xiaomi चे नवीन ध्येय आहे.