Absolutely Lowest! 6GB रॅमसह नवा Redmi A3 स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत फक्त 7000 रुपये। Tech News

Updated on 14-Feb-2024
HIGHLIGHTS

कंपनीचा नवा Redmi A3 स्मार्टफोन अखेर भारतात लाँच

Redmi A3 स्मार्टफोन 23 फेब्रुवारीपासून Flipkart वर उपलब्ध होईल.

Redmi A3 स्मार्टफोनमध्ये 8MP प्रायमरी AI रियर कॅमेरा उपलब्ध

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi चे बजेट विभागात येणारे स्मार्टफोन भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. याच विभागात आता नवीन नाव समाविष्ट झाले आहेत. होय, कंपनीचा नवा Redmi A3 स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा नवीनतम एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे, जो मागील वर्षी लाँच केलेल्या Redmi A2 चा सक्सेसर आहे. जाणून घ्या फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: अलीकडेच लाँच झालेला Vivo X100 Pro फोन अर्ध्यापेक्षा कमी किमतीत उपलब्ध, बघा Best ऑफर। Tech News

Redmi A3 भारतीय किंमत

कंपनीने Redmi A3 स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 7,299 रुपये ठेवली आहे. ही किंमत फोनच्या 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलसाठी आहे. डिस्काउंटनंतर ते 6,999 रुपयांना खरेदी करता येईल. 4GB आणि 128GB मॉडेलची किंमत 8,299 रुपये आहे. फोनच्या हाय वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB मॉडेलची किंमत 9,299 रुपये आहे.

Redmi A3

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 23 फेब्रुवारीपासून Flipkart वर उपलब्ध होईल. फोनमध्ये ऑलिव्ह ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि लेक ब्लू हे तीन कलर ऑप्शन्स सादर करण्यात आले आहेत.

Redmi A3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi A3 फोनमध्ये 6.71 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz आहे. याशिवाय, हा फोन MediaTek Helio G36 प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा फोन Android 13 Go Edition वर कार्य करेल. यासोबतच स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 3GB, 4GB आणि 6GB रॅमचे पर्याय आहेत. त्याबरोबरच, स्टोरेजसाठी यात 64GB आणि 128GB मॉडेल आहेत.

फोटोग्राफीसाठी Redmi A3 स्मार्टफोनमध्ये 8MP प्रायमरी AI रियर कॅमेरा उपलब्ध आहे. यासह तुम्हचे फोटो आपोआप तुम्हाला हवे तसे फोकस होण्यास मदत होईल. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. तर फोनच्या सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :