Redmi ने आज भारतात आपल्या बजेट स्मार्टफोन Redmi A2 चे नवीन मेमरी वेरिएंट लाँच केले आहे. या नवीन Redmi A2 मध्ये 4 GB रॅमसह 128 GB स्टोरेज आहे. आत्तापर्यंत हा मोबाईल फोन भारतीय बाजारात तीन मेमरी वेरिएंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होता. चला तर मग जाणून घेऊयात बजेट स्मार्टफोनच्या नव्या व्हेरिएंटची किंमत आणि संपूर्ण तपशील.
Redmi A2 च्या नव्या 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये आहे. याआधी बाकीच्या व्हेरिएंटची किंमत पुढीलप्रमाणे आहे. 2GB RAM + 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 5,999 रुपये आहे. 2GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये आहे. तर, 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे.
कमी बजेटचा Redmi A2 स्मार्टफोन Amazon आणि MI.com सह Xiaomi रिटेल भागीदारांवर विक्रीसाठी उपलब्ध असेल जिथून तो Aqua ब्लू, क्लासिक ब्लॅक आणि सी ग्रीन रंगांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
Redmi A2 स्मार्टफोन 1600 x 720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.52 इंच HD + DotDrop डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा Redmi फोन Android 13 'Go Edition' वर लाँच करण्यात आला आहे, जो 2.2GHz क्लॉक स्पीडसह MediaTek Helio G36 octa-core प्रोसेसरवर चालतो. यात 3GB व्हर्च्युअल रॅम देखील आहे. MediaTek Helio G36 octa-core चिप परवडणाऱ्या आणि बजेट-अनुकूल स्मार्टफोनमध्ये सुसज्ज असते, जी वापरकर्त्याला कमी खर्चात उत्तम गेमिंग अनुभव देईल. पण हा प्रोसेसर 5G ला सपोर्ट करत नाही.
Xiaomi Redmi A2 च्या मागील पॅनलवर डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये F/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि दुय्यम AI लेन्स देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, फ्रंट पॅनलवर F/2.2 अपर्चरसह 5 मेगापिक्सेल सेल्फी सेन्सर आहे. AI कॅमेरा हे प्री-इंस्टॉल केलेले कॅमेरा फिचर आहे, जे तुम्हाला हुशारीने वस्तू आणि दृश्ये ओळखून आणि त्यानुसार कॅमेरा सेटिंग्ज ऑप्टिमाइझ करून चांगले फोटो घेण्यास मदत करेल.
पॉवर बॅकअपसाठी, Redmi A2 मध्ये 5,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच हा मोबाइल फोन 10W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो. काही बेसिक कामे करताना किंवा वेब सर्फ करताना ही बॅटरी दोन दिवसांपर्यंत टिकण्याची शक्यता आहे.