Redmi ने मागील महिन्यात आपले दोन नवीन बजेट रेंज स्मार्टफोन लाँच केले होते. Redmi A2 आणि Redmi A2+ असे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले होया ते. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे स्मार्टफोन्स 8 हजार रुपयां अंतर्गत लाँच करण्यात आले आहेत. दरम्यान, Redmi A2 च्या 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजची विक्री आधीच सुरु करण्यात आली होती. मात्र, आता या फोनच्या 2GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची विक्री सुरु झाली आहे.
Redmi A2 चा 2GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon India वर उपलब्ध आहे. या व्हेरिएंटची किंमत साईटवर 6,799 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक, लाईट ग्रीन आणि लाईट ब्लु कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किमंत 7 हजार रुपयांअंतर्गत आहे. येथून खरेदी करा
Redmi A2 मध्ये 120Hz टच सॅम्पलिंग रेटसह 6.52-इंच HD+ LCD स्क्रीन आहे. यात हे MediaTek Helio G36 SoC द्वारे समर्थित आहे आणि 4GB पर्यंत RAM आहे. हे 64GB स्टोरेज पॅक करते जे मायक्रोएसडी कार्ड वापरून 512GB पर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक उपलब्ध आहेत.
त्याबरोबरच, यात AI सपोर्टसह ड्युअल रियर कॅमेरा युनिट आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि QVGA कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यासह 5000mAh बॅटरी आहे. बॉक्समध्ये 10W चार्जर उपलब्ध असेल.