Redmi A1+ बजेट स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर, मिळेल 5,000mAh बॅटरी आणि ड्युअल कॅमेरा

Redmi A1+ बजेट स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर, मिळेल 5,000mAh बॅटरी आणि ड्युअल कॅमेरा
HIGHLIGHTS

Redmi A1+ भारतात 14 ऑक्टोबरला लाँच होईल.

8 ते 10 हजारांच्या सुरुवातीच्या किमतीत हा फोन लाँच केला जाईल.

Redmi A1+ सह 5000mAh बॅटरी आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल

Redmi India ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Redmi A1+ भारतात लाँच करण्याची तयारी केली आहे. हा फोन 14 ऑक्टोबरला लाँच होईल, अशी माहिती मिळाली आहे. नुकत्याच लाँच झालेल्या Redmi A1 च्या अपग्रेडेशनवर  Redmi A1+ ऑफर केला जात आहे. Redmi A1+ मध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देखील असेल. Redmi A1+ चा टीझर रिलीज करताना कंपनीने सांगितले आहे की, हा फोन अनेक फीचर्सने सुसज्ज असेल.

हे सुद्धा वाचा : क्रिएटर्स आणि यूजर्सची मज्जाच मजा ! आता YouTube वर मिळणार इंस्टाग्रामचे 'हे' जबरदस्त फिचर

Redmi A1 चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीने मागील महिन्यातच Redmi A1 लाँच केला आहे. या फोनमध्ये 6.52-इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 120Hz आहे. फोनसोबत प्री-इंस्टाल FM रेडिओ देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड सपोर्ट आहे. Redmi A1 सह MediaTek Helio A22 प्रोसेसर आणि Android 12 Go Edition उपलब्ध आहे.

फोनमध्ये 2GB रॅमसह 32GB स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. Redmi A1 सह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 8 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स AI आहे. Redmi A1 च्या फ्रंटला 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

Redmi A1+ चे फीचर्स आणि किंमत 

या फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर आणि 64GB स्टोरेज सपोर्ट केले जाऊ शकते. फोनला 6.52-इंच लांबीचा HD प्लस डिस्प्ले मिळेल, जो 60 Hz रिफ्रेश रेटसह येईल. Redmi A1+ सह 5000mAh बॅटरी आणि 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. 

Redmi A1+ हे Redmi A1 प्रमाणेच मागील पॅनलवर लेदर टेक्सचर डिझाइनसह ऑफर केले जाईल. या फोनला मोठी स्क्रीन आणि मजबूत बॅटरी मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. Redmi A1+ मध्ये फिंगरप्रिंट सेन्सरचाही समावेश करण्यात आला आहे. त्याबरोबरच, कंपनी फोनच्या कॅमेऱ्यातही बदल करण्याची शक्यता आहे. फोनसोबत 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप मिळू शकतो. कंपनीने अद्याप फोनच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. 8 ते 10 हजारांच्या सुरुवातीच्या किमतीत हा फोन लाँच केला जाईल, असे मानले जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo