Xiaomi ने नवीनतम स्मार्टफोन म्हणून, Redmi A1+ लाँच केला आहे. जो नवीन लाँच झालेल्या Redmi A सिरीजमधील लेटेस्ट मेम्बर आहे. हा फोन ग्राहकांना इमर्सिव स्मार्टफोन अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. कंपनीचा दावा आहे की, Redmi A1+ मध्ये प्रथमच स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी अतिशय कमी किमतीत उत्तम फीचर्स आहेत.
हे सुद्धा वाचा : Thank God Trailor : अजय म्हणतो, 'बिग बीं'ना यमलोकमधून मिळाली KBCची आयडिया, बघा मजेशीर ट्रेलर
Redmi A1+ ची किंमत 2GB/32GB व्हेरिएंटसाठी 7,499 रुपये आणि 3GB/32GB व्हेरिएंटसाठी 8,499 रुपये आहे. हे उपकरण Flipkart, mi.com, mi होम आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर 17 ऑक्टोबरपासून दुपारी 12:00 वाजता विक्रीसाठी उपलब्ध असेल. सणाच्या उत्साहात भर घालत, या दिवाळीत, वापरकर्ते रेडमी A1+ 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अनुक्रमे 6,999 आणि 7,999 रुपयांना खरेदी करू शकतात.
कंपनीने एंट्री-लेव्हल स्मार्टफोन सेगमेंटमध्ये बेंचमार्क बनवण्यासाठी डिझाइन केलेले, Redmi A1+ मध्ये एक स्लीक लेदर टेक्स्चर बॅक आहे. ट्रेंडी कलर पॅलेटसह, Redmi A1+ एक रिफाईंड डिझाइन दाखवतो, जो ब्लॅक, लाईट ग्रीन आणि लाईट ब्लु या तीन आकर्षक रंगांमध्ये येतो. वापरकर्त्यांना उच्च-सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक माहिती आणि तपशीलांच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यासाठी, डिव्हाइस मागील फिंगरप्रिंट सेन्सरसह सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की फिंगरप्रिंट सेन्सर वापरकर्त्यांना त्यांचा स्मार्टफोन काही सेकंदात अनलॉक करण्यास सक्षम करतो.
Redmi A1+ मध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 2 दिवसांच्या बॅटरी लाइफसह आहे. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये 8MP ड्युअल कॅमेरा सेट-अपसह समोर 5MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 32GB स्टोरेज आहे, जे पुढे 512GB पर्यंत वाढवता येऊ शकते.