10 हजार रुपयांचा REDMI चा स्वस्त फोन आणखी कमी किमतीत खरेदी करा, वाचा डिटेल्स

Updated on 20-Apr-2023
HIGHLIGHTS

REDMI A1+ मोठ्या सवलतीसह खरेदी करा.

REDMI A1+ ची किमंत आणि ऑफर्स

फोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

Redmi स्मार्टफोन कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी बजेट रेंजचे स्मार्टफोन्स बाजारात आणत असते. जेव्हा या स्वस्त स्मार्टफोन्सवर ऑफर्स येतात, तेव्हा तर ग्राहकांची चांदीच चांदी असते. आज आम्ही तुम्हाला REDMI A1+ वर मिळणाऱ्या मोठ्या सूटबद्दल सांगणार आहोत. ऑर्डर करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या – 

REDMI A1+ ची किमंत आणि ऑफर्स

तुम्ही Flipkart वरून REDMI A1+ चा 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंट ऑर्डर करू शकता. या फोनची MRP 9,999 रुपये आहे. तुम्ही साईटवर थेट 35% डिस्काउंटनंतर 6,499 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. 5% कॅशबॅक मिळवण्यासाठी फ्लिपकार्ट ऍक्सिस बँक कार्डवरून पेमेंट करावे लागेल. त्याबरोबरच, 3,500 रुपयांची सूट स्वतंत्रपणे उपलब्ध आहे.

याव्यतिरिक्त, जर तुम्हाला जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंज करायचा असेल तर, एक्सचेंज ऑफर अंतर्गत भारी सूट उपलब्ध आहे. जर तुमचा फोन उत्तम स्थितीत असेल तर तुम्ही या फोनवर 5,950 रुपयांची सूट मिळवू शकता. अशाप्रकारे अगदी कमी किमतीत हा फोन तुमचा होणार आहे. 

फीचर्स आणि स्पेक्स

या फोनमध्ये 6.52 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले मिळणार आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. Mediatek Helio A22 प्रोसेसर Redmi A1+ मध्ये उपलब्ध असेल. त्याबरोबरच, 8MP रियर कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनसह एका वर्षाची वॉरंटी देण्यात येणार आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :