स्वस्त फोनचा शोध संपला! 5000mAh बॅटरी आणि उत्तम कॅमेरासह Redmi A1 लाँच

स्वस्त फोनचा शोध संपला! 5000mAh बॅटरी आणि उत्तम कॅमेरासह Redmi A1 लाँच
HIGHLIGHTS

Redmi A1 कंपनीचा सर्वात स्वस्त फोन लाँच

या नवीनतम फोनची किमंत केवळ 6,499 रुपये

Redmi A1 मध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी आहे.

Redmi 11 Prime आणि Redmi 11 Prime 5G सोबत, Xiaomi ने Redmi A1 देखील भारतात लॉन्च केला आहे. कंपनीच्या नवीन Redmi A सीरीजचा हा पहिला एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. Redmi A1 त्यांच्यासाठी आहे ज्यांना फीचर फोनवरून Android स्मार्टफोनवर स्विच करायचे आहे. हे HD+ डिस्प्ले आणि मोठ्या बॅटरीसह येते. Redmi मध्ये मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देखील आहे. 

हे सुद्धा वाचा : प्रतीक्षा संपली ! APPLE चा आज सर्वात मोठा लाँच इव्हेंट, iPhone 14सह बरेच जबरदस्त प्रोडक्ट्स होणार लाँच

Redmi A1

 Redmi A1 मध्ये प्रीमियम लेदर-टेक्श्चर डिझाइन मिळते. फोनमध्ये 6.52-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे आणि वरच्या बाजूला एक स्पीकर आहे. फोनमध्ये FM रेडिओ ऍप देखील येतो. Redmi A1 मध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी आहे. तसेच, यामध्ये Mediatek Helio A22 चिपसेट आहे. हे 2GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज आहे. Xiaomi ने असा दावा केला आहे की, त्याने लॅग-फ्री अनुभवासाठी 20+ सॉफ्टवेअर ऑप्टिमायझेशन केले आहे.

याव्यतिरिक्त, Redmi A1 फोनमध्ये 8MP ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. हे HD व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या क्षमतेसह येते. Redmi A1 मध्ये पोर्ट्रेट मोड देखील उपलब्ध आहे.

Redmi A1 ची भारतात किंमत

Redmi A1 सिंगल स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. 2GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेजसह Redmi A1 ची किंमत 6,499 रुपये आहे. फोन ब्लॅक, ग्रीन आणि ब्लु अशा कलर ऑप्शनमध्ये येतो. तुम्ही हा फोन पहिल्यांदा 9 सप्टेंबर रोजी Mi.com, Mi Home Stores, Amazon India वरून खरेदी करू शकाल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo