Redmi 8 भारतात लॉन्च केला गेला आहे. Redmi 8 ऑरा मिरर डिजाइन सह आला आहे आणि फोन सफायर ब्लू, रूबी रेड आणि ओनिक्स ब्लॅक विकल्पांमध्ये मिळेल. स्मार्टफोनचा पहिला सेल 12 ऑक्टोबरला सुरु केला जाईल आणि यूजर्सना Flipkart द्वारा विकत घेता येईल.
Redmi 8 मध्ये 6.22 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 720 x 1520 पिक्सलचे HD+ रेजोल्यूशन ऑफर करतो आणि डिस्प्लेच्या टॉपला डॉट नॉच देण्यात आली आहे.
कॅमेरा सेटअप पाहता Redmi 8 च्या मागे डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजेंस सह आला आहे. कॅमेरा सेटअप मध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे जो 1.4 माइक्रो पिक्सल साइजचा आहे आणि याचा अपर्चर f/1.8 आहे आणि हा सोनीचा IMX363 इमेज सेंसर आहे. दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे जो पोर्ट्रेट शॉट्स साठी उपयोगी पडेल. कॅमेरा फीचर्स मध्ये AI सीन डिटेक्शन, गूगल लेंस सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा AI सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
Redmi 8 च्या मागे फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि सिक्योरिटी साठी फोन मध्ये फेस अनलॉक सपोर्ट पण देण्यात आला आहे. डिवाइस मध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळत आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यूजर्सना USB टाइप-C पोर्ट पण मिळणार आहे आणि बॉक्स मध्ये 10W चा चार्जर पण मिळेल.
Redmi 8 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 SoC द्वारा संचालित आहे जो 4GB रॅम आणि 64GB सह येतो. फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट मिळत आहे आणि फोनची स्टोरेज माइक्रो SD कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते. Redmi 8 P2i स्प्लॅशप्रुफ कोटिंग आणि IR ब्लास्टर सह आला आहे. फोनच्या फ्रंटला गोरिला ग्लास 5 चे प्रोटेक्शन मिळत आहे आणि सोबत 3.5mm ऑडियो जॅक आणि FM रेडियो पण आहे.
Redmi 8 च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरीएंटची किंमत Rs 7,999 आहे आणि 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरीएंट Rs 8,999 मध्ये सादर करण्यात आला आहे. Redmi 8 चा पहिला सेल 12 ऑक्टोबरला रात्री सुरु होईल आणि यूजर्स मी.कॉम, फ्लिप्कार्ट आणि मी होम स्टोर्स वरून हा विकत घेऊ शकतात.
Xiaomi ने असा पण खुलासा केला आहे कि 16 ऑक्टोबरला कंपनी आपला 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन लॉन्च करेल.