Xiaomi Redmi 5A भारतात लेक ब्लू कलर वेरियंट मध्ये झाला लॉन्च, किंमत 5,999 रुपये
नवीन कलर वेरियंट मध्ये हा फोन फ्लिपकार्ट आणि मी.कॉम वर सेल साठी उपलब्ध आहे.
Redmi 5 नंतर शाओमी ने Redmi 5A स्मार्टफोन चा लेक ब्लू कलर वेरियंट भारतात लॉन्च केला आहे. या नव्या कलर वेरियंट च्या येण्याने आता Redmi 5A स्मार्टफोन 4 कलर वेरियंट मध्ये उपलब्ध झाला आहे. नवीन कलर लेक ब्लू वेरियंट व्यतिरिक्त, हा स्मार्टफोन रोज गोल्ड, गोल्ड आणि डार्क ग्रे कलर मध्ये येतो.
या स्मार्टफोनच्या नव्या कलर वेरियंट ची किंमत 5,999 रुपये आहे, जी 2GB मॉडल साठी आहे, तर 3GB मॉडल ची किंमत 6,999 रुपये आहे. नवीन कलर वेरियंट मध्ये हा फोन फ्लिपकार्ट आणि मी.कॉम वर सेल साठी उपलब्ध आहे. शाओमी ने या गोष्टीची घोषणा आपल्या अधिकृत ब्लॉग मधुन केली आहे, जिथे शाओमी कडून हेही सांगण्यात आले की Redmi 5A चे 5 मिलियन यूनिट्स विकले गेले आहेत.
शाओमी चे फोंस भारतात खुप लोकप्रिय आहेत आणि Redmi 5A स्मार्टफोन ने पण विक्री च्या बाबतीत मोठे यश मिळवले आहे. शाओमी Redmi 5A च्या स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन पाहता यात 720P रिजॉल्यूशन सह 5 इंचाच्या एचडी IPS डिस्प्ले आहे.
हा डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425 क्वॉड कोर 1.4GHz एसओसी वर चालतो. हा स्मार्टफोन 2GB/3GB रॅम आणि 16GB/32GB इंटरनल स्टोरेज वेरियंट मध्ये येतो, फोन च्या इंटरनल स्टोरेज ला माइक्रो एसडी कार्ड ने 128GB पर्यंत एक्सपांड करता येते.
कॅमेरा पाहता Redmi 5A स्मार्टफोन मध्ये 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा डिवाइस एंड्रॉयड 7.1 नौगट वर आधारित MIUI 9 आउट ऑफ द बॉक्स वर चालतो. Redmi 5A ची बॅटरी 3000 एमएएच ची आहे. कनेक्टिविटी ऑप्शन बद्दल बोलायाचे झाले तर हा फोन 4G VoLTE, ब्लूटूथ, USB आणि GPS सपोर्टिव आहे. पण हो, या बजेट फोन मध्ये फिगंरप्रिंट सेंसर ची कामतरता जाणवते.