मागील काही काळापासून Redmi च्या बजेट रेंजमधील येणाऱ्या आगामी स्मार्टफोनची चर्चा सुरु होती. आता अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज भारतासह जागतिक बाजारपेठेत Redmi 13C सिरीज लाँच करण्यात आली आहे. लक्षात घ्या की, सिरीज अंतर्गत दोन हँडसेट 5G आणि 4G व्हर्जन लाँच करण्यात आले आहेत. लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून फोन विकले जातील. चला तर मग बघुयात स्मार्टफोनची किंमत आणि सर्व तपशील.
हे सुद्धा वाचा: Important Tips: तुमचा विद्यमान फोन विकण्याआधी ‘ही’ महत्त्वाची कामे करून घ्या, अन्यथा…। Tech News
Redmi 13C 4G चे बेस व्हेरिएंट 7,999 रुपयांच्या स्पेशल लाँच प्राईससह आणले गेले आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. तर, 8GB रॅमसह 256GB स्टोरेजसह टॉप व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये इतकी आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन Amazon वर 12 डिसेंबर 2023 पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Redmi 13C 5G चे बेस व्हेरिएंट स्पेशल लाँच प्राईससह 9,999 रुपयांमध्ये आणला गेला आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. तसेच, 8GB रॅमसह 256GB स्टोरेज या टॉप व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनची विक्री 16 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल.
या फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्ही फोनवर ICICI बँकेच्या कार्डवर 1000 रुपयांची झटपट सूट आहे. तर, 5G व्हेरिएंटवर 1000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे. Redmi ने आपले स्मार्टफोन स्टार्टलाइट ब्लॅक, स्टारट्रेल सिल्व्हर आणि स्टारट्रेल ग्रीन कलर ऑप्शन्ससह लाँच केले आहेत.
दोन्ही स्मार्टफोन्समध्ये मोठा 6.74 इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. डिस्प्लेसह कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
5G व्हेरिएंटसह येणाऱ्या फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आहे. तर, 4G व्हेरिएंटमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे.
5G व्हेरिएंटमध्ये फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर, 4G व्हेरिएंटमध्ये 50MP AI ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
तसेच, फोनला पॉवर देण्यासाठी या दोन्ही फोन्समध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे. ही बॅटरी वेब सर्फिंग आणि इतर मूलभूत कार्यांसह दोन दिवस टिकू शकते.