Redmi 13C 4G स्मार्टफोनची सेल आजपासून भारतात सुरू झाली आहे. हा फोन अलीकडेच लाँच करण्यात आला आहे, जो बाजारातील बजेट रेंजमध्ये येणाऱ्या इतर स्मार्टफोन्सना जोरदार स्पर्धा देईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, काही जागतिक बाजारपेठेनंतर गेल्या आठवड्यात हे उपकरण भारतात लाँच करण्यात आले. त्यानंतर आजपासून या स्मार्टफोनची विक्री देखील भारतात सुरु झाली आहे.
Redmi 13C आज दुपारी 12 वाजतापासून Mi.com, Xiaomi आणि Amazon वरून खरेदी करता येईल.बघुयात पहिल्या सेलमधील उपलब्ध फोनवरील सर्व ऑफर्स-
Redmi 13C 4G स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये आहे. तर, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB व्हेरिएंट अनुक्रमे 8,999 रुपये आणि 10,499 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय, ग्राहकांना ICICI बँक क्रेडिट कार्ड किंवा EMI व्यवहारांवर एकूण 1000 रुपयांची सूट ऑफर करण्यात येत आहे. येथून खरेदी करा
लक्षात घ्या की, हा फोन 4G आणि 5G दोन्हीसह लाँच करण्यात आला होता. 5G स्मार्टफोनची किंमत 4GB + 128GB व्हेरिएंटसाठी 9,999 रुपये, 6GB + 128GB व्हेरिएंटसाठी 11,499 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटसाठी 13,499 रुपये ठेवण्यात आली आहे. वर सांगितलेल्या, तिन्ही प्लॅटफॉर्मवर हा स्मार्टफोन 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता व्रिकीसाठी उपलब्ध होईल.
हा Redmi फोन 6.74-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेसह येतो, जो 90Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा डिवाइस MediaTek Helio G85 चिपसेटने सुसज्ज आहे. हा बजेट स्मार्टफोन 8GB पर्यंत RAM सह 8GB व्हर्च्युअल रॅम सपोर्ट आणि 256GB स्टोरेज ऑफर करतो. मायक्रो SD कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो, ज्यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 2MP मॅक्रो लेन्स आणि आणखी 2MP लेन्स समाविष्ट आहेत. या हँडसेटमध्ये 5MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 18W चार्जरद्वारे फास्ट चार्ज केली जाऊ शकते. मात्र, लक्षात घ्या की तुम्हाला बॉक्समध्ये केवळ 10W चा चार्जर मिळणार आहे.