Xiaomi Redmi ने गेल्या वर्षी भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Redmi 13C लाँच केला होता. हा मोबाईल 5G आणि 4G या दोन मॉडेलमध्ये आला होता. हे दोन्ही स्मार्टफोन्स बजेट सेक्शनमध्ये लाँच केले गेले होते. त्यापैकी कंपनीने आता Redmi 13C 4G च्या किमतीत घट केली आहे. होय, ब्रँडने या फोनच्या 4GB रॅम व्हेरिएंटची किंमत 1,000 रुपयांनी कमी केली आहे. जाणून घेऊयात Redmi 13C 4G ची नवीन किंमत-
हे सुद्धा वाचा: 32MP सेल्फी कॅमेरासह येणाऱ्या Motorola razr 40 वर मिळतोय तब्बल 16000 रुपयांचा Discount, येथून ऑर्डर करा। Tech News
Redmi 13C भारतीय बाजारपेठेत तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. या फोनचा 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 8,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. वर सांगितल्याप्रमाणे, या व्हेरियंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. जो आता 7,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
त्याबरोबरच, फोनच्या इतर दोन व्हेरिएंटचा किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. तर, 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये इतकी आहे. हा फोन स्टारडस्ट ब्लॅक, स्टारफ्रॉस्ट व्हाइट आणि स्टारशाइन ग्रीन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
Redmi 13C 4G फोनमध्ये 6.74-इंच लांबीचा HD+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे, हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी स्क्रीनसह कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे संरक्षण आहे. त्याबरोबरच, Redmi 13C 4G फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी MediaTek Helio G85 चिपसेट प्रदान करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, MediaTek Helio G80 रोजच्या मोबाईल गेमर्ससाठी आदर्श आहे. प्रोसेसर AI-कॅमेरा कार्यप्रदर्शन वाढवले. त्याबरोबरच, प्रीमियम फोटो कॉलिटीसह मल्टी-कॅमेरा फोटोग्राफीचा अनुभव देखील मिळेल.
ऑप्टिक्सबद्दल बोलायचे झाल्यास, Redmi 13C च्या मागील पॅनलवर 50MP चा मुख्य सेन्सर दिला गेला आहे. त्याबरोबरच, यात AI सेन्सरसह 2MP मॅक्रो लेन्स आहे. तसेच, आकर्षक सेल्फी काढण्यासाठी आणि भारी रील्स बनवण्यासाठी हा फोन 8MP फ्रंट कॅमेराच्या सपोर्टसह येतो. पॉवरसाठी या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो.