Xiaomi सब-ब्रँड Redmi भारतात आपल्या Redmi सीरीजचा एक नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. कंपनीने अलीकडेच घोषणा केली आहे की, ती 6 डिसेंबर रोजी भारतात Redmi 13C स्मार्टफोन लाँच करेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा लो बजेट स्मार्टफोन 50MP कॅमेरासह देशात दाखल होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनची अपेक्षित किंमत आणि संपूर्ण तपशील.
हे सुद्धा वाचा: Limited Time Deal! iQOO 12 लाँच होण्यापूर्वी iQOO 11 5G च्या किमतीत मोठी कपात, अप्रतिम इयरबड्स देखील Free
Redmi 13C भारतात 6 डिसेंबर रोजी लाँच केला जाईल, अशी अधिकृत घोषणा कंपनीने केली आहे. फोनचे प्रोडक्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह केले गेले आहे. यामध्ये तुम्हाला ‘Notify me’ चे बटण देखील दिसेल. या पेजवर फोनचा फोटो शेअर करताना कंपनीने फोनचे कलर ऑप्शन्स देखील उघड केले आहेत. होय, Redmi 13C स्टारडस्ट ब्लॅक आणि स्टार शाइन ग्रीन कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.
Redmi 13C नुकतेच जागतिक स्तरावर लाँच करण्यात आले असून नायजेरियामध्ये उपलब्ध आहे. जिथे त्याची सुरुवातीची किंमत भारतीय चलनानुसार सुमारे 10,100 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे, Redmi 13C ची भारतीय किंमत 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये ठेवली जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे.
हा फोन आधीच जागतिक स्तरावर लाँच करणात आले आहे. त्यानुसार, हा फोन 6.74 इंच लांबीचा HD+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन IPS LCD वर बनवली आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटवर काम करेल. प्रोसेसिंगसाठी फोनमध्ये MediaTek Helio G99 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 4GB, 6GB आणि 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. यामध्ये 50MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा फोन 5MP फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी यात 5,000 mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाच्या समर्थनासह येते.