बजेट किमतीत भारतात लाँच झाला Redmi 13 5G, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स

Updated on 09-Jul-2024
HIGHLIGHTS

Redmi 13 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे.

Redmi 13 5G विक्रीसाठी लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर उपलब्ध होणार

Redmi 13 5G फोन 50% चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतात.

Redmi 13 5G Launched in India: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi च्या नव्या Redmi 13 5G स्मार्टफोन लाँचची चर्चा सर्वत्र सुरु होती. अखेर आज Redmi 13 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Xiaomi चा हा फोन क्रिस्टल ग्लास डिझाइनसह आणण्यात आला आहे. Redmi चा हा 5G स्मार्टफोन विक्रीसाठी लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर उपलब्ध होणार आहे. जाणून घेऊयात Redmi 13 5G ची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स-

Also Read: 108MP कॅमेरासह Tecno Spark 20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन

Redmi 13 5G ची भारतीय किंमत

Redmi 13 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅमसह 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. फोनचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. फोनचा बेस व्हेरिएंट 13,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. तर, फोनचा टॉप व्हेरिएंट 15,499 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.

#Redmi 13 5G

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांची सूट मिळेल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची विक्री 12 जुलै 2024 पासून सुरू होईल. लक्षात घ्या की, Redmi 13 5G स्मार्टफोन हवाईयन ब्लू आणि ब्लॅक डायमंड या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.

Redmi 13 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Redmi 13 5G स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.67 इंच लांबीचा LCD डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Redmi 13 5G स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा Redmi स्मार्टफोन Android 14 वर आधारित Xiaomi च्या नवीनतम HyperOS वर चालेल. फोनमध्ये सिंगल स्पीकर देण्यात आला आहे. तसेच, फोन फास्ट साउंड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे, यामध्ये IR ब्लास्टर सेन्सर देखील देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP मुख्य कॅमेरा आहे. फोनच्या मागील बाजूस 2MP सेन्सर उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट उपलब्ध आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन 5030mAh बॅटरीसह येतो. यात 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. हा फोन 50% चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :