Redmi 13 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Redmi 13 5G फोनच्या भारतीय लाँचबद्दल अनेक लीक्स पुढे येत आहेत. आता अखेर कंपनीने स्मार्टफोनच्या लाँच तारखेची पुष्टी केली आहे. होय, कंपनी अखेर हा फोन भारतात लाँच करणार आहे. लक्षात घ्या की, आगामी फोनसाठी एक समर्पित मायक्रोसाइट देखील Amazon वर लाईव्ह करण्यात आली आहे. या साइटच्या माध्यमातून लाँचपूर्वी फोनचे अनेक फीचर्स समोर आले आहेत. विशेष म्हणजे हा कंपनीचा बजेट फोन आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Redmi 13 5G फोनचे इंडिया लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: 108MP कॅमेरासह Infinix Note 40 5G फोन भारतात लाँच, कमी किमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स
आम्ही तुम्हाला सांगतो की, Redmi ने आपल्या Redmi India अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलवर Redmi 13 5G फोनच्या लाँच डेटची पुष्टी केली आहे. हा फोन भारतात येत्या 19 जुलै रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, वर सांगितल्याप्रमाणे आगामी Redmi 13 5G फोन Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. हा कंपनीचा 5G फोन असेल, जो बजेट रेंजमध्ये सादर केला जाईल.
Amazon साईटच्या माध्यमातून फोनचे डिझाइन आणि अनेक प्रमुख फीचर्स समोर आले आहेत. लिस्टिंगनुसार, हा फोन क्रिस्टल ग्लास डिझाइनसह दाखल होणार आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिला जाणार आहे. याशिवाय, सेल्फी कॅमेरासाठी पंच-होल कटआउट असेल. तसेच, हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज असेल, असा कंपनीने खुलासा केला आहे.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. फोनमध्ये 108MP प्रायमरी कॅमेरा असेल. मात्र, इतर सेन्सर्सची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तर, फोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असण्याची अपेक्षा आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आगामी Redmi 13 5G हा फोन मागील वर्षी लाँच झालेल्या Redmi 12 5G चा उत्तराधिकारी असणार आहे. मागील मॉडेल देखील बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनची किंमत 11,999 रुपये आहे. स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.79 इंच लांबीचा डिस्प्ले, Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर, 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी इ. फीचर्स अप्रतिम देण्यात आले आहेत.