लेटेस्ट Redmi 13 5G स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. त्यानंतर, आज या फोनची पहिली विक्री भारतात सुरु होणार आहे. पहिल्या सेलदरम्यान या आठवड्याच्या सुरुवातीला लाँच झालेला हा स्मार्टफोन स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीने हा फोन दोन रॅम व्हेरियंटमध्ये सादर केला आहे. चला तर मग जाणून घेऊयात Redmi 13 5G फोनची किंमत आणि सर्व तपशील-
Redmi 13 5G च्या बेस व्हेरिएंटमध्ये 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. तर, टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो. या फोनची किंमत अनुक्रमे बेस व्हेरिएंट 13,999 रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 15,499 रुपये आहे. या फोनची विक्री आज दुपारी 12 वाजता सुरू होईल.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन Amazon वरून खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झल्यास, सेलदरम्यान या फोनवर 1000 रुपयांची सूट मिळेल. हा स्मार्टफोन हवाईयन ब्लू आणि ब्लॅक डायमंड या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
Redmi 13 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, रीफ्रेश रेट 90Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट उपलब्ध आहे. हा फोन फास्ट साउंड फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे. यामध्ये IR ब्लास्टर सेन्सर देखील देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये सिंगल स्पीकर देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 108MP मुख्य कॅमेरा आहे. फोनच्या मागील बाजूस 2MP सेन्सर उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5030mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. हा फोन 50% चार्ज होण्यासाठी 30 मिनिटे लागतात.