Redmi 12C Price in India: कंपनीचा स्वस्त स्मार्टफोन नव्या रूपरंगात सादर, किमंत 10 हजारांहून कमी

Updated on 22-Jun-2023
HIGHLIGHTS

Redmi 12C नवीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटसह लाँच

नव्या व्हेरिएंटची विक्री ग्राहकांसाठी 22 जूनपासून सुरू

4GB रॅमसह 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे.

Redmi 12C Price in India: Xiaomi ने भारतातील ग्राहकांसाठी लोकप्रिय बजेट स्मार्टफोन Redmi 12C चे नवीन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट लाँच केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Redmi 12C च्या नवीन वेरिएंटमध्ये तुम्हाला 4GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळेल. हा कंपनीचा फोन आधीपासून इतर व्हेरिएंट्समध्ये देखील उपलब्ध आहे. 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. 

Redmi 12C चे इतर व्हेरिएंट्स

या 4GB रॅमसह 128GB स्टोरेज व्हेरिएंटची विक्री ग्राहकांसाठी 22 जूनपासून सुरू होणार आहे. Redmi 12C च्या इतर वेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, 4GB रॅमसह 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 8,999 रुपये आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

Redmi 12C चे फीचर्स आणि स्पेक्स

Redmi 12C मध्ये 6.71-इंच लांबीचा HD प्लस रिझोल्यूश आणि 60 Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले उपलब्ध असेल. हा डिस्प्ले 500 nits पीक ब्राइटनेस ऑफर करतो. त्याबरोरबच, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, फोनमध्ये आता 4GB रॅमसह 64GB स्टोरेज,  6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध असतील. 

त्याबरोबरच, आकर्षक आणि उत्तम फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तुम्हाला 50-मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरासह 2-मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेन्सर मिळेल. तसेच, फोनच्या पुढील बाजूस 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :