Redmi चा हा स्वस्त फोन लवकरच भारतात होणार लाँच, बघा अपेक्षित किंमत

Updated on 11-Jan-2023
HIGHLIGHTS

Redmi 12C भारतात लाँच होण्यासाठी सज्ज

फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते.

फोन सुमारे 8,400 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच होण्याची शक्यता

Redmi चा नवीन फोन Redmi 12C भारतात येण्यासाठी सज्ज झाला आहे. Redmi 12C हा एक स्वस्त फोन आहे, जो गेल्या वर्षी चीनमध्ये लॉन्च झाला होता. रेडमी 12C चा भारतीय व्हेरिएंट देखील चीनी व्हेरिएंटच्या डिझाइनमध्ये सादर केला जाईल अशी अपेक्षा आहे. 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत बार्सिलोनामध्ये होणाऱ्या MWC 2023 च्या आधी Redmi 12C भारतात लॉन्च केला जाईल, अशी माहिती मिळाली आहे. नवीन फोन Redmi 10C चे अपग्रेडेड व्हर्जन असेल.

हे सुद्धा वाचा : Amazon Great Republic Day Sale 2023ची तारीख जाहीर, 'या' कार्डवर मिळतील ऑफर्स

Redmi 12C चे संभावित भारतीय फीचर्स

Redmi 12C चीनमध्ये 6.71-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे, ज्याची ब्राइटनेस 500 nits आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.एका अहवालानुसार, Redmi 12C ला ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU सोबत MediaTek Helio G85 प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये 6 GB रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. 

Redmi India ने अद्याप Redmi 12C बाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. Redmi 12C च्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 3.5mm हेडफोन जॅक असेल आणि चार्जिंगसाठी मायक्रो USB पोर्ट उपलब्ध असेल. फोनमध्ये 5000mAh बॅटरी असून 10W चार्जिंग उपलब्ध असेल.

 Redmi 12C सह हायब्रिड ड्युअल सिम सपोर्ट उपलब्ध असेल. याशिवाय, फोनमध्ये LPDDR4X रॅम आणि eMMC 5.1 मेमरी आहे. फोनमध्ये बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आला आहे. Redmi 12C चीनमध्ये विकला जात आहे.

किंमत :

Redmi 12C चीनमध्ये 699 चीनी युआन म्हणजेच सुमारे 8,400 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :