REDMI च्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोन्सची पहिली सेल, ‘या’ ऑफर्ससह खरेदीसाठी उपलब्ध
Redmi 12C आणि Redmi Note 12 भारतात सेल सुरु
ICICI बँक कार्डने व्यवहार केल्यास अतिरिक्त सूट
दोन्ही फोन Amazon, Mi.com, Mi-Studio, Mi Home वर उपलब्ध
REDMI ने अलीकडेच Redmi 12C आणि Redmi Note 12 भारतात लाँच केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स आज खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दोन्ही स्मार्टफोन अगदी तुमच्या बजेटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात दोन्ही फोन्सची किंमत आणि ऑफर्स.
हे दोन्ही फोन Amazon, Mi.com, Mi-Studio, Mi Home आणि ऑथराईझ्ड रिटेल पार्टनर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
Redmi 12C ची किमंत
Redmi 12Cच्या 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजची किमंत 8,999 रुपये आहे. तर, 6GBरॅम आणि 128GB स्टोरेज 10,999 रुपये आहे. त्याबरोबरच, ICICI बँक कार्डने व्यवहार केल्यास 500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळत आहे. त्यानंतर फोनची किंमत अनुक्रमे 8,499 आणि 10,499 रुपये इतकी होईल.
Redmi Note 12 ची किंमत
Redmi Note 12 च्या 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजची किमंत 14,999 रुपये आहे. तर, 6 GBरॅम आणि 128GB स्टोरेज 16,999 रुपये आहे. त्याबरोबरच ICICI बँक कार्डने व्यवहार केल्यास 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळत आहे. त्यानंतर फोनची किंमत अनुक्रमे 13,999 आणि 15,999 रुपये इतकी होईल.
विशेषतः Xiaomi आणि Redmi युजर्ससाठी कंपनीने दोन्ही स्मार्टफोन्सवर 1,500 रुपयांची अतिरिक्त सवलत देखील जाहीर केली आहे. त्यानंतर, 6GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजची किमंत 13,499 रुपये होईल. तर, 6 GBरॅम आणि 128GB स्टोरेज 15,999 रुपये आहे. दोन्ही फोन्सचा साविस्तर तपशील वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile