Redmi ने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. Redmi 12 हा स्मार्टफोन भारतात ऑगस्ट महिन्यात लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता 3 महिन्यांनी कंपनीने Redmi 12 च्या किमतीत विशेष कपात केली आहे. हा फोन 4GB रॅम आणि 6GB रॅम अशा दोन व्हेरिएंटमध्ये येतो. लक्षात घ्या की, कंपनीने या फोनच्या 6GB रॅम व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात, Redmi 12 ची नवी किंमत-
कंपनीने Redmi 12 स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत तब्बल 1500 रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी या फोनची किंमत 11,999 रुपये होती, पण आता या व्हेरिएंटची किंमत 10,499 रुपये झाली आहे. याशिवाय, HDFC बँकेच्या कार्डद्वारे फोनवर 1000 रुपयांची डिस्काउंट ऑफरही दिली जात आहे.
हा फोन तुम्हाला जेड ब्लॅक, मूनस्टोन सिल्व्हर आणि पेस्टल ब्लू या आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल. या फोनची नवी किंमत कंपनीच्या अधिकृत साईट Mi.Com आणि Flipkart वर सूचिबद्ध करण्यात आली आहे.
Redmi 12 फोनमध्ये 6.79 इंच लांबीचा FHD+ LCD डिस्प्ले आहे. डिस्प्लेच्या संरक्षणासाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. याशिवाय हा फोन Octa-core MediaTek Helio G88 12nm प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासह फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल.
फोटोग्राफीसाठी, Redmi च्या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. जर तुम्ही फोटोग्राफी करण्याचे शौकीन असाल तर, 50MP प्रायमरी कॅमेरा योग्य पर्याय ठरेल. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा देखील मिळणार आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्याला सपोर्ट देण्यात आला आहे.