Redmi 12 5G च्या खरेदीवर एक अप्रतिम ऑफर दिली जात आहे. Redmi चा हा फोन या वर्षी म्हणजे 2023 मध्येच लाँच करण्यात आला होता. फोनमध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी यासारख्या चांगल्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. Redmi च्या स्वस्त 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर जोरदार ऑफर उपलब्ध आहेत. Xiaomi या फोनसोबत Redmi Watch 3 Active मोफत देत आहे. बघा सविस्तर-
हे सुद्धा वाचा: 12 हजार रुपयांचा Samsung Galaxy M04 तब्बल 40% Discount सह खरेदी करा, बघा Best ऑफर
या स्मार्टफोनच्या बेस 4GB रॅम + 128GB वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. तर, त्याचा टॉप व्हेरिएंट 14,999 रुपयांना येतो. फोन जेड ब्लॅक, मूनस्टोन सिल्व्हर आणि पेस्टल ब्लू या तीन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Mi.com वर कंपनी Redmi 12 5G सह बंडल ऑफर देत आहे. या फोनसोबत Redmi Watch 3 Active खरेदी करून तब्बल 7,250 रुपयांची बचत करता येणार आहे. एवढेच नाही तर, या फोनच्या खरेदीवर, HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर 1,000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, 1,000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळेल.
Redmi चा हा फोन 6.79 इंच FHD+ डिस्प्ले सह येतो. या फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनदेखील डिस्प्लेसह देण्यात आला आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. फोनचे इंटर्नल स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे वाढवता येईल.
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा मिळेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 5,000mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग फीचरसह येईल.