Good News! पुन्हा एकदा Redmi 12 5G स्मार्टफोनच्या किमतीत कपात, पूर्वीपेक्षा फोन आणखी स्वस्तात। Tech News
मागील वर्षी लाँच Redmi 12 5G बजेट विभागात बेस्ट सेलिंग स्मार्टफोन
Redmi 12 5G भारतातील सर्वात स्वस्त 5G फोनच्या यादीत समाविष्ट
कंपनीने 6GB आणि 8GB रॅम व्हेरियंटची किंमत 500 रुपयांनी कमी केली.
जर तुम्ही Xiaomi च्या 5G फोन्सचे चाहते असाल आणि नवीन फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Xiaomi च्या स्वस्त फोनबद्दल बोलायचे झाल्यास, मागील वर्षी लाँच Redmi 12 5G या विभागात बेस्ट सेलिंग स्मार्टफोन आहे. हा मोबाईल भारतात फक्त 11,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता, जो भारतातील सर्वात स्वस्त 5G फोनच्या यादीत समाविष्ट आहे.
कालांतराने या स्मार्टफोनच्या किमतीत कंपंनीने घट केली होती. त्यानंतर, आता परत एकदा कंपनीने Redmi 12 5G ची किंमत थेट 500 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर हा स्वस्त 5G फोन आणखी कमी दरात खरेदी करता येईल. बघा नवी किंमत-
हे सुद्धा वाचा: Motorola चा आगामी स्मार्टफोन फक्त 7000 रुपयांअंतर्गत लाँच होण्याची शक्यता, लवकरच भारतात होणार लाँच। Tech News
Redmi 12 5G ची नवी किंमत
Redmi 12 5G फोन भारतात 4GB RAM, 6GB RAM आणि 8GB RAM या तीन रॅम व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. लक्षात घ्या की, कंपनीने 6GB आणि 8GB रॅम व्हेरियंटची किंमत 500 रुपयांनी कमी केली आहे. हे दोन्ही मॉडेल्स आधी अनुक्रमे 13,499 रुपये आणि 15,499 रुपयांना उपलब्ध होते. परंतु, कपातीनंतर हे फोन 12,999 रुपये आणि 14,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तर, Redmi 12 5G च्या 4GB RAM व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.
Redmi 12 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Redmi 12 5G मध्ये 6.79 इंच लांबीचा फुल HD+ पंच-होल डिस्प्ले आहे, ज्याच्या रिफ्रेश रेट 90Hz आहे. ही स्क्रीन IPS LCD वर बनवलेली आहे. ही स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 द्वारे संरक्षित आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी कंपनीने फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनच्या मागील पॅनलवर F/1.8 अपर्चरसह 50MP प्राइमरी लेन्स दिलेली आहे. त्याबरोबरच, 2MP डेप्थ कॅमेरासह LED फ्लॅश आहे. त्याचप्रमाणे, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये F/2.0 अपर्चरसह 8MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 28 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते किंवा त्यावर 30 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक टाइम देखील मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile