Redmi ने दोन Popular स्वस्त स्मार्टफोनच्या किमतीत केली कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News

Updated on 04-Mar-2024
HIGHLIGHTS

Redmi Note 12 4G आणि Redmi 12 4G स्मार्टफोनच्या किमतीत कपात

दोन्ही स्मार्टफोनच्या 6GB + 128GB मेमरी व्हेरिएंटच्या किमतीत कपात

निवडक बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 1500 रुपयांची अतिरिक्त सूट

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने आपल्या दोन Redmi स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. Redmi Note 12 4G आणि Redmi 12 4G च्या 6GB + 128GB मेमरी व्हेरिएंटच्या किमतीत कपात झाली आहे. जी आता Live करण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स बजेट रेंजमध्ये म्हणजेच 10,000 ते 12,000 रुपये किंमतीच्या सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आले होते. चला तर मग जाणून घेऊयात या दोन्ही स्मार्टफोनच्या नव्या किमती-

हे सुद्धा वाचा: Upcoming Smartphones this Week: आगामी Nothing Phone 2a पासून तर Realme 12+ 5G पर्यंत ‘हे’ Powerful फोन भारतात होणार लाँच

Redmi Note 12 4G ची नवीन किंमत

Redmi Note 12 4G

किमतीत कपात झाल्यानंतर या फोनची किंमत 6GB + 64GB व्हेरिएंटसाठी 10,999 रुपयांपासून सुरू होते. त्याबरोबरच, 6GB + 128GB कॉन्फिगरेशनसह येणारा टॉप-एंड मॉडेल 1000 रुपयांच्या किंमत कपातीनंतर 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला Flipkart वरून निवडक बँक क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड व्यवहारांवर 1500 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. ग्राहकांना निवडक मॉडेल्सच्या एक्सचेंजवर 1500 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. हा फोन आइस ब्लू, लुनर ब्लॅक आणि सनराइज गोल्ड कलर ऑप्शन्ससह येतो.

मुख्य स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 6.67-इंच लांबीच्या FHD+ sAMOLED डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट120Hz इतका आहे. परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Snapdragon 685 चिपसेट मिळेल. फोटोग्राफीसाठी, यात 50MP + 8MP + 2MP रीअर आणि 13MP सेल्फी लेन्स मिळेल.

Redmi 12 4G ची नवीन किंमत

Redmi 12 4G Price drop

Redmi 12 4G चा 4GB+ 128GB व्हेरिएंट 9,499 रुपयांना येतो. तर, 6GB + 128GB व्हर्जनची किंमत 500 रुपयांनी कमी करण्यात आली असून या फोनची किंमत 10,499 रुपये इतकी झाली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Mi.com वरून तुम्ही HDFC बँक, SBI, ICICI बँक, Axis बँक आणि कोटक महिंद्रा बँकेच्या निवडक बँक कार्ड्सद्वारे 6GB RAM मॉडेलवर 1000 रुपयांची झटपट सूट मिळवू शकता. त्याबरोबरच, ग्राहक या व्हेरियंटवर नो-कॉस्ट EMI चा देखील लाभ घेऊ शकतात.

हा फोन जेड ब्लॅक, मूनस्टार सिल्व्हर आणि पेस्टोरल ब्लूमध्ये कलर ऑप्शन्ससह खरेदी करता येईल. Redmi 12 फोन 6.79-इंच लांबीच्या FHD+ स्क्रीनसह येतो, जो 90Hz रीफ्रेश रेट ऑफर करतो. त्याबरोरबच, डिव्हाइस MediaTek Helio G88 प्रोसेसर मिळेल. तर, 18W चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी, फोटोग्राफीसाठी 50MP + 8MP + 2MP मागील आणि 8MP सेल्फी लेन्स देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :