Redmi 11 Prime च्या किमतीत कपात, जाणून घ्या नवे दर

Updated on 11-May-2023
HIGHLIGHTS

Redmi 11 Prime च्या किमतीत दोन हजार रुपयांची घट

5,000 mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

कॅमेरा म्हणून यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर

Redmi 11 Prime गेल्या वर्षी भारतात लाँच करण्यात आला होता. कंपनीकडून Redmi 11 Prime च्या किमतीत आता कपात करण्यात आली आहे. हा मोबाइल 12,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध होता, जो आता आणखी स्वस्त करण्यात आला आहे. कंपनीकडून त्याची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आजपासून तुम्ही हा फोन नव्या किमतीत खरेदी करू शकता. 

Redmi 11 Prime ची नवी किंमत

वर सांगितल्याप्रमाणे Redmi 11 Prime 12,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. फोनच्या किमतीत दोन हजार रुपयांची घट झाली आहे.  हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो. 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिएंटची नवी किंमत 10,999 रुपये आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची नवी किमंत 12,999 रुपये झाली आहे. 

Redmi 11 Prime चे स्पेसिफिकेशन्स

Redmi 11 Prime मध्ये 6.58-इंच लांबीची IPS इनसेल स्क्रीन मिळणार आहे. वॉटरड्रॉप नॉच स्टाइलसह हा डिस्प्ले फुल HD + रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. याला 90Hz रिफ्रेश रेट दिला गेला आहे. Redmi 11 Prime हा 4G फोन आहे, जो MediaTek Helio G99 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. या Redmi फोनमध्ये Android 12 OS आधारित MIUI उपलब्ध आहे.

या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 2-मेगापिक्सेल पोर्ट्रेट सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :